शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाने राहुल गांधींना सुनावले खडेबोल  
2
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
3
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
4
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
5
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
6
रेपो दराच्या बैठकीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ, तुमच्या शहरात २४ कॅरेट सोन्याचा भाव काय?
7
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
8
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
9
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
10
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
11
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
12
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
13
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
14
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
15
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली
16
IND vs ENG: ३५ धावा की ४ गडी... पाचवी कसोटी निर्णायक वळणावर, 'हा' घटक भारतासाठी ठरेल 'गेमचेंजर'
17
ट्रम्प यांच्यासोबतची मैत्री तुटल्यानंतर मस्क मोठ्या अडचणीत; टेस्लाला द्यावे लागणार तब्बल २ हजार कोटी
18
ट्रम्पच्या जिगरी दोस्तावर पाकिस्तान का चिडला? पोस्ट लिहीत व्यक्त केला राग! शाहबाज शरीफ म्हणाले... 
19
"सचिन माझ्या मुलाचा बाप...", महिलेने दाखवला DNA रिपोर्ट; राजा रघुवंशीच्या घरात भलताच वाद
20
हृदयस्पर्शी! बाळासाठी वडील झाले वासुदेव, पुराच्या पाण्यातून काढली वाट, भावुक करणारा Video

गोंदियातील बनावट बिडी कारखान्यावर धाड : १८ नामांकित कंपन्यांचे बनावट बिडी पॅकेट्स

By अंकुश गुंडावार | Updated: June 18, 2025 20:32 IST

Gondia : रिकामे रॅपर्स व पॅकिंग मशिनरी जप्त

गोंदिया : रामनगर पोलिसांनी मंगळवारी (दि.१७) रात्री शहरातील एका बनावट बिडी बनविणाऱ्या कारखान्यावर व त्याच्या गोदामावर धाड टाकली. यात मोठ्या प्रमाणात बिडी तयार करण्याचे साहित्य, रॅपर्स, पॅकिंग मशिन जप्त केली आहे.

शहरातील पूनाटोली, लोकमान्य टिळक वॉर्ड येथील कारखान्यातून बनावट बिडीची हजारो पाकिटे व गोल बिडी, मंगलोर देसाई बिडी, मनोहर बिडी, मंगलोर गणेश बिडी, भारत बिडी, कोंब्रा ब्रँड बिडी, सबडे बिडी, मुर्गा ब्रँड बिडी, ५०२ नंबर बिडी, बादशाही बिडी आदीचे लेबल आणि इतर कच्चा माल आणि यंत्रसामग्री तसेच लाखो किमतीच्या बिड्या आणि तयार बिडी पॅकेट्स (कट्टे), भाजण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या तंदूर जाळी, रिकामे रॅपर, फेविकॉल, गोंद, कच्चा माल आणि पॅकिंगसाठी वापरल्या जाणाऱ्या मशीन जप्त केल्या आहेत. गोंदिया शहरात बनावट बिडी निर्मितीच्या कारखाना सुरू असल्याची माहिती मिळाली असता गोल बिडी कंपनीचे एरिया सेल्स मॅनेजरच्या तक्रारीवरून रामनगर पोलिसांनी संबंधित गोदामावर धाड टाकून ही कारवाई केली.

कमी दरात विक्री केली जात असल्याने फुटले बिंगछत्तीसगडच्या धमतरी येथे तयार केलेल्या प्रसिद्ध ब्रँडेड गोल बिडी कंपनीच्या पॅकेटचा दर प्रति बंडल १७० रुपये आहे. परंतु गोंदिया सह जवळच्या शहरी बाजारपेठांमध्ये, मूळ बिड्यांसारख्याच बनवलेल्या या गोल कंपनीच्या बनावट बिड्या १३५ ते १४० रुपयांना विकल्या जात आहेत, ज्यामुळे मूळ गोल बिड्यांची विक्री कमी झाली आहे आणि कंपनीचे आर्थिक नुकसान हाेत होते.

साडेतीन लाख रुपयांचा माल जप्त

रामनगर पोलिस स्टेशन गाठणारे कंपनीचे एरिया सेल्स मॅनेजर प्रवीण कुमार कदम यांनी याबाबत तक्रार केली, त्यानंतर शहरातील पुनाटोली येथील कारखान्याच्या गोदामावर छापा टाकताना ३.५ लाख रुपयांचा माल जप्त करण्यात आला. यानंतर, त्यांच्या गोल बिडी ब्रँडच्या नावाने बनावट बिड्या तयार करण्याचे काम येथे सुरू असल्याच्या घटनेला दुजोरा मिळाला.

तीन आरोपींवर गुन्हा दाखलगोल बिडी कंपनीचे निरीक्षक राजेश भुरे यांच्या तक्रारीवरुन हा बनावट बिडीचा कारखाना चालविणारे आरोपी माणिकलाल बोडलू पानतवणे (५६ राहणार पुनाटोली) आकाश माणिकलाल पानतवणे (२९, पुनाटोली) देवेंद्र टिळकचंद गजभिये (३६) मोहगाव यांच्या विरुद्ध कॉपीराइट कायद्याचे कलम ५१, ६३,१०३), कलम १०४ अंतर्गत गुन्हा क्रमांक २३४/२५ अंतर्गत रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

टॅग्स :gondiya-acगोंदियाCrime Newsगुन्हेगारी