शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

राहुल गांधींच्या हुंकार सभेने बदलणार का समीकरण !

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2024 16:22 IST

काँग्रेसमध्ये उत्साह : भाजपकडून मोदी की योगींची सभा

लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील प्रचारात आता रंगत आली आहे. दिग्गज नेत्यांच्या प्रचारसभांमधून मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मंगळवारी गोंदिया येथे महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ काँग्रेस नेते राहुल गांधी यांची प्रचारसभा पार पडली. या सभेत राहुल गांधी यांनी थेट जनतेच्या प्रश्नांना हात लावत व त्यांच्याशी संवाद साधत एकप्रकारे हुंकार भरला. या सभेनंतर काँग्रेसमध्ये उत्साह संचारला आहे. त्यामुळे हा उत्साह मतदारसंघातील समीकरणाची दिशा बदलणार का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

गोंदिया विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीतील काँग्रेसचे उमेदवार गोपालदास अग्रवाल आणि महायुतीतील भाजपचे उमेदवार विनोद अग्रवाल यांच्यात थेट लढत होणार आहे. या मतदारसंघातील लढतीत दररोज चुरस वाढत आहे. २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार असल्याने जाहीर प्रचारासाठी आता केवळ चार दिवसांचा कालावधी उरला आहे. त्यामुळे कमी कालावधीत प्रचारसभा, रॅली यातून मैदान मारण्यासाठी दोन्ही उमेदवारांचा प्रयत्न सुरू आहे. 

विशेष म्हणजे मतांचे विभाजन करणारा महत्त्वाचा तिसरा उमेदवार या मतदारसंघात नसल्याने थेट लढत ही अग्रवाल विरुद्ध अग्रवाल अशी होणार आहे. त्यामुळे लढत काट्याची होणार अशी चर्चा या मतदारसंघात आहे. या मतदारसंघातून १५ उमेदवार रिंगणात असले तरी मतदारांच्या नजरा या दोनच उमेदवारांकडे लागल्या आहेत. महाविकास आघाडीचे उमेदवार गोपालदास अग्रवाल यांच्या निवडणूक प्रचारार्थ मंगळवारी गोंदियात काँग्रेस नेते राहुल गांधी यांची प्रचार सभा पार पडली. या सभेनंतर सभेला उपस्थित असलेल्या जनसमुदायात एक वेगळाच उत्साह पाहायला मिळाला. मतदानाला सहा दिवस शिल्लक असताना निर्माण झालेला हा उत्साह मतदारसंघाची दिशा ठरविण्यात महत्त्वपूर्ण ठरणार आहे, तर दुसरीकडे महायुतीच्या उमेदवारानेसुद्धा प्रचारात संपूर्ण ताकद लावली आहे. त्यामुळे या मतदारसंघातील नेमके समीकरण काय तयार होते याकडे मतदारांच्या नजरा लागल्या आहेत. 

महायुतीकडून केले जातेय मंथन राहुल गांधी यांच्या प्रचारसभेनंतर गोंदिया येथे त्याच तोडीची प्रचारसभा व्हावी यासाठी महायुतीकडून सध्या मंथन केले जात आहे. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यापैकी कोणाची सभा घ्यावी यासाठी सध्या रणनीती आखली जात आहे.

सभेनंतर निर्माण झालेला उत्साह कायम ठेवण्याचे आव्हान राहुल गांधींच्या सभेनंतर काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकत्यांमध्ये उत्साह संचारला आहे. त्यामुळे हा उत्साह मतदानाच्या शेवटच्या दिवसापर्यंत कायम ठेवण्याचे आव्हान काँग्रेसचे उमेदवार आणि नेत्यांसमोर असणार आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४gondiya-acगोंदियाRahul Gandhiराहुल गांधी