राहुल बजाज सीबीएसई दहावीत अव्वल

By Admin | Updated: May 29, 2016 01:58 IST2016-05-29T01:58:05+5:302016-05-29T01:58:05+5:30

गोंदिया शहरातील पाच शाळांसह देवरीतील एका शाळेतून विद्यार्थ्यांनी दहावी सीबीएसई अभ्यासक्रमाची परीक्षा दिली होती.

Rahul Bajaj, CBSE top 10 | राहुल बजाज सीबीएसई दहावीत अव्वल

राहुल बजाज सीबीएसई दहावीत अव्वल

गोंदिया : गोंदिया शहरातील पाच शाळांसह देवरीतील एका शाळेतून विद्यार्थ्यांनी दहावी सीबीएसई अभ्यासक्रमाची परीक्षा दिली होती. त्या सर्व शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. त्यात गोंदियातील साकेत पब्लिक स्कूलच्या राहुल बजाज या विद्यार्थ्याने ९८.८० टक्के गुण घेऊन प्रथम येण्याचा बहुमान पटकावला.
निकालात सर्वाधिक प्रावीण्य श्रेणीतील विद्यार्थी देण्याचा बहुमान गोंदिया पब्लिक स्कूलने पटकावला आहे. या शाळेतून सर्वात जास्त १५६ विद्यार्थी दहावीच्या परीक्षेला बसले होते. त्यापैकी ५४ जणांनी ९० टक्केपेक्षा जास्त गुण पटकावले आहेत. जिल्ह्यात दुसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण होण्याचा मान साकेत स्कूलच्या तृप्ती बिसेन हिने ९७.८० टक्के गुण घेऊन पटकावला, तर तिसरा क्रमांक सेंट झेव्हीयर्सचा दीप कलंत्री व गोंदिया पब्लिक स्कूलच्या निखिल बिसेन यांनी याने ९७.६० टक्के गुण घेऊन पटकावला आहे. सेंट झेव्हियर्स स्कूलमधून १२० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली, त्यापैकी २६ जण प्रावीण्य श्रेणीत, साकेत पब्लिक स्कूलमध्ये ६५ पैकी १९, प्रोग्रेसिव्ह स्कूलमधील ४५ पैकी १८ तर दिल्ली पब्लिक स्कूलमधील १७ पैकी ५ विद्यार्थ्यांनी प्रावीण्य श्रेणी गाठली. देवरीतील न्यू सीता पब्लिक स्कूलनेही १०० टक्के निकाल दिला, मात्र कोणाला प्रावीण्य मिळाले नाही. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: Rahul Bajaj, CBSE top 10