प्रतापगडवर राबविले स्वच्छता अभियान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2017 00:20 IST2017-02-23T00:20:22+5:302017-02-23T00:20:22+5:30
अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील प्रतापगड येथे महाशिवरात्री निमित्त (दि.२४) यात्रा महोत्सव आहे.

प्रतापगडवर राबविले स्वच्छता अभियान
बोंडगावदेवी : अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील प्रतापगड येथे महाशिवरात्री निमित्त (दि.२४) यात्रा महोत्सव आहे. भगवान महादेवाचे दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या भाविकांना गैरसोय होवू नये, यासाठी वन विभाग व महागाव येथील हरित सेनेचे विद्यार्थी, गावातील संयुक्त वन व्यवस्थापन समिती तसेच ग्रामस्थ यांनी संयुक्तरित्या स्वच्छता अभियान राबविले.
वनपरिक्षेत्राधिकारी कार्यालय अर्जुनी-मोरगाव तसेच गोठणगाव कार्यालयाचा कार्यभार सांभाळणारे वनपरिक्षेत्राधिकारी छत्रपाल रहांगडाले यांच्या नेतृत्वाखाली वन विभागाचे सर्व कर्मचारी, महागाव येथील हरित सेनेचे विद्यार्थी, प्रतापगड येथील वन व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायतचे पदाधिकारी यांच्या सहकार्याने प्रतापगड यात्रा परिसराची सर्वत्र साफसफाई करण्यात आली. भाविकांना गडावर जाणे सहज शक्य व्हावे यासाठी पायऱ्या तसेच लगतचे रस्ते रहदारीस योग्य करण्यात आले.
परिसरात अस्तव्यस्त पसरलेले टाकावू वस्तू जमा करून जाळण्यात आले. आरएफओ रहांगडाले यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतापगड यात्रा परिसरात एक दिवस स्वच्छता मोहीम राबवून परिसर स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यामुळे भाविकांना सुविधा होणार आहे.