शेतकऱ्यांना रब्बी हंगामाचे प्रशिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:50 IST2021-02-05T07:50:37+5:302021-02-05T07:50:37+5:30
अध्यक्षस्थानी प्रगतशील शेतकरी छबीलाल पंचम पटले होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मिलिंद कुंभरे, सरपंच ...

शेतकऱ्यांना रब्बी हंगामाचे प्रशिक्षण
अध्यक्षस्थानी प्रगतशील शेतकरी छबीलाल पंचम पटले होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मिलिंद कुंभरे, सरपंच सरिता राणे, ग्रामपंचायत सदस्य रमेश साठवणे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष माधव शरणागत, पोलीस पाटील रतन खोब्रागडे तसेच मार्गदर्शक म्हणून तालुका कृषी अधिकारी के.एन. मोहाडीकर, कृषी अधिकारी वाय.बी. बावणकर उपस्थित होते.
या प्रशिक्षणात माती नमुना कसा घ्यायचा, माती परीक्षणानुसार पिकांसाठी खत मात्रा कशी घ्यायची, सेंद्रिय शेती, पिकांचे फेरबदल, यांत्रिकीकरण, कृषी विभागाच्या विविध योजना, रब्बी पिकांवरील कीड व रोग, पाणी नियोजन, हिरवळीचे खत इत्यादी विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. संचालन करून आभार कृषी सहाय्यक एन.डी. रहांगडाले यांनी मानले. प्रशिक्षणासाठी कृषी सहाय्यक रजनी रामटेके, एस.एस. लांडे, कृषी सेवक जितेंद्र बावनकुळे, उमेश सोनेवाने, आत्माचे तंत्रज्ञान व्यवस्थापक अरविंद उपवंशी, प्रगतशील शेतकरी हंसराज साठवणे, विजय साठवणे यांनी सहकार्य केले.