टाकलेल्या कागदावर लिहिणारा छंदवेडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2017 00:24 IST2017-02-25T00:24:47+5:302017-02-25T00:24:47+5:30
कुदरत का करिश्मा है! माणूस खरच किती बुद्धिमान, गुणवान आहे, असाच एक शेणामातीच्या घरात वास्तव

टाकलेल्या कागदावर लिहिणारा छंदवेडा
अनेक साहित्यांचे लिखाण : मांडले जोपासतात २३ वर्षापासून लेखनछंद
बाराभाटी : कुदरत का करिश्मा है! माणूस खरच किती बुद्धिमान, गुणवान आहे, असाच एक शेणामातीच्या घरात वास्तव करणारा आणि रोज वृत्तपत्रांच्या कागदावर साहित्य लेखन करणारे कवी म्हणजे मुन्ना मंडले होय. साहित्य व सांस्कृतिक वारसा जपणाऱ्या अर्जुनी-मोरगाव येधील कुंभीटोलाचे मुलचंद उर्फ मुन्ना मंडले असे या साहित्यीकांचे नाव आहे. वयाच्या ३६ व्या वर्षापासून लेखन कार्याला त्यांनी सुरूवात केली. आज ही ६३ व्या वर्षी त्यांचे लेखन कार्य सुरू आहे. त्याचा जन्म अर्जुदा टिकरी (ता.जी. दुर्ग) येथे झाला. शिक्षण फक्त पाचवी पास आहे. मात्र या माणसाच्या साहित्यावरून खूप मानवी मूल्यात भर पडते.
त्यांच्या लेखनाचे नानाविध प्रकार आहेत. १०० सुविचार, दहा मधुरवाणी १५० कविता, ५० गीत, २०० भजन नानाविध गझल मुशायरा, अभंग, डोली, देशभक्ती, बालगीतांचा मंडलेंचा संग्रह आहे. शिक्षण, ज्ञान, आत्मविश्वास अशी त्यांची ध्येय दृष्टी आहे. पण त्यांचे कोणतेही साहित्य प्रकाशीत झाले नाही. हिंदी व मराठी भाषेत त्यांचे साहित्य आहे. त्याचप्रमाणे पाच वर्षामध्ये २०-३० लोककलेची किर्तनेसुध्दा त्यांनी लिहीली आहेत. विशेष म्हणजे साहित्य जपतानाच मंडलेंचा सामाजिक कार्यातही महत्वाचा वाटा आहे. मागील १० वर्षापासून ते बौध्द धर्माचा प्रचार-प्रसार करीत आहेत. (वार्ताहर)