धापेवाडा प्रकल्पाचा प्रश्न मार्गी लागणार
By Admin | Updated: February 12, 2015 01:16 IST2015-02-12T01:16:53+5:302015-02-12T01:16:53+5:30
धापेवाडा उपसा सिंचन प्रकल्पाच्या मुद्याला घेऊन आमदार विजय रहांगडाले यांनी सिंचन विभागाचे मुख्य अभियंता अविनाश सुर्वे यांच्यासोबत चर्चा केली.

धापेवाडा प्रकल्पाचा प्रश्न मार्गी लागणार
तिरोडा : धापेवाडा उपसा सिंचन प्रकल्पाच्या मुद्याला घेऊन आमदार विजय रहांगडाले यांनी सिंचन विभागाचे मुख्य अभियंता अविनाश सुर्वे यांच्यासोबत चर्चा केली. चर्चेत कार्यकारी अभियंता सुर्वे यांनी काही तांत्रीक अडचणी सोडविण्यात आल्यानंतर या प्रकल्पाचे पाणी शेतकऱ्यांना मिळणार असल्याचे सांगीतले.
प्रकल्पांतर्गत खैरबंदा जलाशयात पाणी सोडण्यात येणार असून तांत्रीक अडचणीमुळे कवलेवाडा ते खैरबंदा तलावापर्यंत जाणाऱ्या पाईप लाईनचे काम थांबलेले होते. त्याकरिता आमदार विजय रहांगडाले यांनी सातत्याने पाठपुरावा करुन सदर प्रश्न मार्गी लागावा अशी मागणी शासनाकडे केली होताी. त्याच प्र्रकारे बोदलकसा व चोरखमारा तलावामध्ये पाणी सोडण्याकरिता कवलेवाडा ते चोरखमारा व बोदलकसा पाईप लाईन टाकून पाणी सोडण्यात यावे ही मागणीही त्यांनी उचलून धरली आहे.
या दोन्ही विषयांना घेऊन नुकतीच त्यांनी सिंचन विभागाचे मुख्य अभियंता सुर्वे यांच्या सोबत बैठक घेतली. या बैठकीत कार्यकारी अभियंता सुर्वे यांच्या सोबत वरील विषयांवर चर्चा करण्यात आली. यात संबंधित धापेवाडा प्रकल्प, बॅरेज व खैरबंधा जलाशयात पाणी सोडण्यात येईल व त्याचा लाभ शेतकऱ्यांना मिळेल असे सुर्वे यांनी सांगितले. त्याच प्रकारे चोरखमारा, बोदलकसा तलावात पाणी भरण्याकरिता पाईप लाईनचा सर्वे तसेच तांत्रिक व प्रशासकीय मान्यते करीता प्रलंबित असलेले प्रकरण मार्गी लावण्यात येतील असे सांगितले. (शहर प्रतिनिधी)