शहरं
Join us  
Trending Stories
1
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
2
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
3
पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन?
4
Shubham Dubey : सरकारी नोकरीत रिजेक्टचा ठपका; मग एका रात्रीत 'करोडपती' होऊन तो IPL स्टार कसा बनला?
5
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
6
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
7
भ्रष्टाचाराची तक्रार केली, ग्राम प्रमुखाला जेव्हा कळलं तेव्हा झाला 'मोठ्ठा कांड'! काय घडलं?
8
Travel Tips: फिरण्याची आवड आहे पण खिशाला परवडत नाही? जगभ्रमंतीची 'अशी' फिटवा हौस 
9
Sandeepa Virk : "दिग्दर्शक रात्री खोलीत शिरला, केली घाणेरडी मागणी"; अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव
10
IMDb Play Trick: सावधान! IMDb वर मोफत चित्रपट पाहण्याचा 'हा' जुगाड पडू शकतो महागात!
11
"दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक
12
विराटच्या खांद्याला खांदा लावून वर्ल्डकप जिंकला, आता IPL 2026 मध्ये करतोय पंचगिरी, कोण आहे 'हा' खेळाडू?
13
Top Marathi News LIVE Updates: 'मविआ'कडून अंबादास दानवे विधान परिषदेचे उमेदवार- आदित्य ठाकरे
14
३३ व्या वाढदिवसाचा भयंकर स्टंट! गोरेगावमध्ये पेट्रोल ओतून रस्ता पेटवला; रील स्टारला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
15
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
16
"संजय राऊत, अशी मुक्ताफळं उधळताना तुम्हाला लाज वाटली नाही का..?"; भाजप नेत्याचा खरमरीत सवाल
17
सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला! पारा ४५ अंशांच्या पार; 'या' तारखेला राज्यात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज
18
नवरदेव झिंगत डुलत आला, कारमधून उतरताना लटपटला, संतप्त वधूने तिथेच लग्न मोडले
19
आलिशान गाडी अन् ५५ लाख, 'मॅडम कलेक्टर'चा पर्दाफाश; नोकरीच्या नावाखाली तरुणांना फसवलं
20
Watermelon Price: मुंबईतील 'त्या' घटनेनंतर कलिंगडाचे दर कोसळले, आता किती रुपयांना मिळतंय?
Daily Top 2Weekly Top 5

क्वारंटाईन सेंटर व कंटेन्मेंट झोन वगळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2020 05:00 IST

जिल्ह्यात ६० हून अधिक कोरोन रूग्ण आढळून आले होते व देवरी तालुका सोडून अन्य सातही तालुक्यातील आहेत. शिवाय बाहेरून व्यक्तींना आलेल्या व्यक्तींना जिल्हा परिषदेच्या शाळांत क्वारंटाईन करण्यात आले आहे. असे एकूण ६४१ क्वारंटाईन सेंटर आहेत. तर रूग्ण आढळल्याने सध्यातरी २२ कंटोनमेंट झोन आहेत. त्यामुळे या गावांतील शाळांना वगळण्यात येणार आहे.

ठळक मुद्दे२६ च्या ठोक्यासाठी शिक्षण विभाग सज्ज : प्राथमिक शिक्षण विभागाने केले नियोजन

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : २६ तारखेलाच शाळेचा ठोका वाजविण्यासाठी राज्याच्या शिक्षण विभागाची तयारी सुरू आहे. त्यानुसार, जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाने आपली तयारी केली असून ते २६ तारखेलाच शाळेचा ठोका वाजविण्यासाठी सज्ज आहे. यात मात्र, जिल्ह्यात क्वारंटाईन सेंटरसाठी दिलेल्या ६४१ शाळा तसेच कंटोनमेंट झोनमध्ये असलेल्या गावांतील शाळांना वगळण्यात येणार आहे.२६ जून पासून नवीन शैक्षणिक सत्राची सुरूवात होत असून जिल्हा परिषद शाळांचाही ठोका त्याच दिवशी वाजतो. यंदा मात्र कोरोनामुळे सर्वच व्यवस्था विस्कटलेली दिसत असून शाळा कधी सुरू होणार व कधी सुरू करायच्या याबाबत चित्र स्पष्ट झालेले नाही.त्यामुळे शिक्षण विभाग व पालक दोघे संभ्रमात आहेत. मात्र राज्याच्या शिक्षण विभागाकडून आदेश येतील तेव्हा येतील. परंतु येथील माध्यमिक शिक्षण विभागाने आपली तयारी करून ठेवली असून २६ तारखेलाच शाळेचा पहिला वाजविण्यासाठी प्राथमिक शिक्षण विभाग सज्ज आहे.जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या एक हजार ६६२ प्राथमिक शाळा असून यंदा दोन लाक २८ हजार ५८४ एवढी विद्यार्थी संख्या आहे. त्यानुसार, प्राथमिक शिक्षण विभागाने आपले नियोजन करून घेतले आहे.शासनाने विदर्भात २६ जून तर उर्वरित महाराष्ट्रात १५ जूनपासून शाळा सुरू करण्यास तयारी दर्शविली आहे. त्यामुळे शिक्षण विभागाने सज्ज असणे गरजेचे असल्याने प्राथमिक शिक्षण विभागाने पूर्ण तयारी करून ठेवली आहे.क्वारंटाईन सेंटर व कंटेन्मेंट झोनमधील शाळांना सुटजिल्ह्यात ६० हून अधिक कोरोन रूग्ण आढळून आले होते व देवरी तालुका सोडून अन्य सातही तालुक्यातील आहेत. शिवाय बाहेरून व्यक्तींना आलेल्या व्यक्तींना जिल्हा परिषदेच्या शाळांत क्वारंटाईन करण्यात आले आहे. असे एकूण ६४१ क्वारंटाईन सेंटर आहेत. तर रूग्ण आढळल्याने सध्यातरी २२ कंटोनमेंट झोन आहेत. त्यामुळे या गावांतील शाळांना वगळण्यात येणार आहे.शाळा व्यवस्थापन समित्यांना अधिकारशिक्षण विभागाने २६ जूनपासून शाळा सुरू करण्याचे आदेश देण्यात आल्याचे कळत असले तरिही आपल्या गावातील शाळा उघडायची की नाही याबाबतचे अधिकार गावस्तरावर शाळा व्यवस्थापन समित्यांना देण्यात आले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कित्येक पालक आपल्या अपत्यांना शाळेत पाठविण्याच्या मानसिकतेत नाहीत. अशात शाळा व्यवस्थापन समित्यांना सभा घेऊन काय करायचे हे ठरवायचे आहे अशी माहिती आहे.

टॅग्स :Schoolशाळाcorona virusकोरोना वायरस बातम्या