मोठ्या जाऊने लहानीला विहिरीत ढकलले

By Admin | Updated: November 24, 2014 22:59 IST2014-11-24T22:59:15+5:302014-11-24T22:59:15+5:30

आपला नवरा मोठ्या जाऊचेच ऐकतो यामुळे तिने नवऱ्याला समज दिली. मात्र नवरा बायकोचे न ऐकता वहिनीचेच ऐकायचा. यामुळे दोन जावांमध्ये भांडण झाले. या भांडणाचा वचपा काढण्यासाठी

Pushing Lahhani well in the well | मोठ्या जाऊने लहानीला विहिरीत ढकलले

मोठ्या जाऊने लहानीला विहिरीत ढकलले

गोंदिया : आपला नवरा मोठ्या जाऊचेच ऐकतो यामुळे तिने नवऱ्याला समज दिली. मात्र नवरा बायकोचे न ऐकता वहिनीचेच ऐकायचा. यामुळे दोन जावांमध्ये भांडण झाले. या भांडणाचा वचपा काढण्यासाठी मोठ्या जाऊने लहान जाऊला चक्क विहीरीत ढकलून तिच्या खुनाचा प्रयत्न केला. ही घटना मंगळवारी सकाळी १० वाजता त्यांच्या शेतावर घडली.
गंगाझरी पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या ढाकणी येथील लक्ष्मी युवराज राऊत (३२) ही महिला आपला पती युवराज याला मोठी जाऊ शामकला धर्मराज राऊत (३८) हिच्या घरी जाण्यास मनाई केली. तरी देखील तो तिच्या घरी जायचा व तिच्या मनाप्रमाणे वागायचा. यामुळे लक्ष्मी व शामकला यांच्यात वाद झाला. या वादातून शामकलाने लक्ष्मीचा काटा काढण्याचा प्रयत्न केला. १८ नोव्हेंबर रोजी नेहमीप्रमाणे लक्ष्मी आपल्या शेतातील झोपडीत जेवणाचा डबा ठेवून अंगात घालणारा शर्ट शोधत होती. तो शर्ट विहीरीच्या तोंडीवर ठेवला होता. तो शर्ट घेण्यासाठी लक्ष्मी गेली असता विहीरीजवळ तीन फुटावर उभी असलेली श्यामकला मागून आली व लक्ष्मीला धक्का देऊन विहीरीत पाडले.
३० खोल फुट विहीरीतील पाण्यात पडलेली लक्ष्मी पाण्यात डुबकी खाऊन वर येताच तिने त्या विहीरीत मोटार पंपासाठी बसविलेल्या पाईपचा आधार घेतला. पायऱ्याच्या माध्यमातून वर येऊ लागली. त्यामुळे शामकलाने पुन्हा तिच्यावर दगडाने वार केला. परंतु लक्ष्मीने आरडाओरड केल्यामुळे दुसऱ्या बांधीत धान कापणारी लक्ष्मीची नणद देवलाबाई परसराम ठाकरे (४०) रा.ढाकणी ही धावत आली.
तिने शामकलाला धक्का देऊन बाजूला केले व लक्ष्मीला हात देवून विहीरीतून बाहेर काढले. त्यानंतर लक्ष्मीने आपबिती घरच्यांना सांगितली. परंतु घरचेही हे प्रकरण दडपत असल्याचे पाहून लक्ष्मी आपल्या मुला-मुलींना घेऊन माहेरी गुरूवारी आली.
शनिवारी या संदर्भात गंगाझरी पोलिसात तक्रार केली. गंगाझरी पोलिसांनी आरोपी श्यामकलाविरूध्द भादंविचे कलम ३०७ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तिला पोलिसांनी अटक केली आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Pushing Lahhani well in the well

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.