ग्रामपंचायतीत अनेक दिग्गजांना धक्का
By Admin | Updated: July 29, 2015 01:19 IST2015-07-29T01:19:37+5:302015-07-29T01:19:37+5:30
पिंडकेपार येथील ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये गोंदिया जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष मदन पटले यांच्या पत्नी ...

ग्रामपंचायतीत अनेक दिग्गजांना धक्का
सुकडी (डाकराम) : पिंडकेपार येथील ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये गोंदिया जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष मदन पटले यांच्या पत्नी पुष्पा मदन पटले यांना ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये पराभव पत्करावा लागला. याशिवाय जि.प.च्या माजी सभापती संगीता दोनोडे यांनाही पराभवाचा सामना करावा लागला.
तिरोडा तालुक्यातील सर्वात महत्वपूर्ण व सर्व तालुक्यातील नागरिकांच्या नजरा पिंडकेपार ग्राम पंचायत्ीाकडे लागल्या होत्या. या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये गोंदिया जि.प.चे माजी उपाध्यक्ष मदन पटले व तिरोडा पंचायत समितीचे माजी उपसभापती टुंडीलाल शरणागत यांनी जि.प. निवडणुकीदरम्यान भाजपात प्रवेश करुन पिंडकेपार ग्रामपंचायतवर भाजपा झेंडा आणणार हा संकल्प केला. उपसभापती टुंडीलाल शरणागत यांनी ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये हस्तक्षेप करुन पुष्पा मदन पटले यांच्याविरोधात वॉर्ड क्र.१ मधून प्रतिमा तानशेन शेंडे यांना उभे केले. यामध्ये प्रतिमा शेंडे विजय झाल्या. त्याचप्रमाणे वॉर्ड १ मध्ये चंदन भिमसे व त्यांच्याविरोधात ताराचंद बेहरे उभे होते. भिमसे यांना पराभव पत्करावा लागला. वॉर्ड क्र.२ मधून माजी सरपंच गोपिका टेंभेकर यांच्या विरोधात नंदेश्वरबाई उभ्या होत्या. त्यामध्ये टेंभेकर विजयी झाल्या. वॉर्ड क्र. २ मधून महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष लेखराम मेश्राम, भागवत कटरे व लखन शरणागत उभे होते. त्यामध्ये भागवत कटरे विजयी झाले. वॉर्ड नं. ३ मधून कार्यरत सरपंच शालीकराम भेलावे व गणेश बघेले हे निवडणूक रिंगणात होते. त्यामध्ये शालीकराम भेलावे विजयी झाले. वॉर्ड ३ मधून उपसरपंच वनमाला जांभुळकर, कल्पना शिंपी, रिंकी साखरे, कटरे बाई या रिंगणात होत्या. त्यामध्ये कल्पना शिंपी विजयी झाल्या. महत्वाची गोष्ट म्हणजे वॉर्ड क्र.२ मधून राहुन वॉर्ड क्र.३ मधून निवडणूक लढून जिंकणारे सरपंच शालीकराम भेलावे यांचा कार्यकाळ चांगल्या असल्याचे निष्पन्न झाले.
बोदलकसा ग्रामपंचायतचे एकूण ३ वॉर्ड असून दोन वॉर्डची निवडणूक अविरोध झाली. फक्त वॉर्ड क्र.१ मध्येच निवडणूक घेण्यात आली. या वॉर्ड क्रमांक १ मध्ये चैतलाल चंदन पटले व त्यांच्याविरोधात सेवानिवृत्त ग्रामसेवक मेवालाल पटले उभे होते. हे दोन्ही चुलतभाऊ होते. यामध्ये चैतलाल पटले यांनी मेवालाल पटले यांचा १०४ मतांनी पराभव केला आहे. बोदलकसा वॉर्ड क्र.२ मधून भाऊलाल साखरे, नितू उईके, वॉर्ड क्रमांक ३ मध्ये अनु. जमातीची एक जागा रिक्त आहे. या जागेसाठी रामदास उईके यांचा उमेदवारी अर्ज रद्द झाला.