नीतू पशिने हत्याकांडातील मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्या

By Admin | Updated: September 2, 2015 01:56 IST2015-09-02T01:56:30+5:302015-09-02T01:56:30+5:30

नीतू पशिने यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्या या मागणीसाठी मंगळवारी येथील व्यापारी संघटना तसेच

Punish the killers of Neetu Police for killing the killers | नीतू पशिने हत्याकांडातील मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्या

नीतू पशिने हत्याकांडातील मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्या

अर्जुनी-मोरगाव : नीतू पशिने यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्या या मागणीसाठी मंगळवारी येथील व्यापारी संघटना तसेच तालुका काँग्रेस कमिटीच्यावतीने शांती रॅली काढून निवेदन देण्यात आले.
येथील व्यापारी सुरेश पशिने यांच्या पत्नी नीतू यांची ९ जुलै रोजी दिवसाढवळ्या त्या घरी एकट्याच असताना हत्या करण्यात आली. या हत्येतील आरोपींना ४८ दिवसानंतर पकडले. या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्यावी यासाठी व्यापारी संघटना व तालुका काँग्रेस कमिटीच्यावतीने शांती रॅली काढण्यात आली. या रॅलीचे तहसील कार्यालयात सभेत रुपांतर झाले. व्यापारी संघटनेचे अध्यक्ष लुनकरण चितलंगे, जिल्हा परिषद सदस्य गिरीश पालीवाल, माजी जि.प. अध्यक्ष चंद्रशेखर ठवरे, नामदेव कापगते, राकेश शुक्ला आदिंनी तिव्र भावना व्यक्त करुन कठोर शिक्षेची मागणी केली. संघटनांच्या वतीने नायब तहसीलदार ए.एस. पाटील यांना निवेदन देण्यात आले. यावेळी बहुसंख्य व्यापारी संघटनेचे व कॉंग्रेस कमिटीचे पदाधिकारी उपस्थित होते. या सभेचे संचालन संजय जायस्वाल यांनी केले.

Web Title: Punish the killers of Neetu Police for killing the killers