किराणाच्या यादीतून डाळी ‘आऊट’

By Admin | Updated: February 22, 2015 01:31 IST2015-02-22T01:31:07+5:302015-02-22T01:31:07+5:30

‘दाल रोटी खाओ, प्रभुके गुण गाओ...’ ही सर्वत्र प्रचलीत असलेली म्हण आज मात्र खोटी ठरत असल्याचे चित्र आहे. त्यामागचे कारण असे की, ...

The pulse 'out' from the grocery list | किराणाच्या यादीतून डाळी ‘आऊट’

किराणाच्या यादीतून डाळी ‘आऊट’

गोंदिया : ‘दाल रोटी खाओ, प्रभुके गुण गाओ...’ ही सर्वत्र प्रचलीत असलेली म्हण आज मात्र खोटी ठरत असल्याचे चित्र आहे. त्यामागचे कारण असे की, डाळींच्या चढत्या किमतीमुळे डाळ खरेदी करणे आजसामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर झाले आहे. गुरूवारचे (दि.१९) भाव बघितल्यास डाळ ९० रूपये किले दराने विक्री झाली. हेच कारण आहे की, किरानाच्या यादीतून डाळी आऊट होत आहेत.
जेवणाचा परिपूर्ण मेन्यू म्हटला की, डोळ््यापुढे वरण, भात भाजी व पोळी असलेले ताट येते. यात वरणाचा पहिला क्रमांक असतो. आजघडीला मात्र वाढत्या महागाईमुळे जेवणात पहिल्या क्रमांकावर असलेले हे वरण ताटातून गायब होत आहे. डाळींचे गगनाला भिडत चाललेले भाव यास कारणीभूत असून महागड्या डाळी खरेदी करण्यासाठी सर्व सामान्य माणूस धजावत नसल्याचे दिसून येते. परिणामी जेवणाच्या ताटातून वरण गायब होत आहे.
गुरूवारी (दि.१९) भाव बघितल्यास, ठोक बाजारात डाळ आठ हजार ३०० ते आठ हजार ४०० रूपये प्रति क्विटल पर्यंत होती. तर चिल्लर बाजारात ९० रूपये प्रतिकिलो दराने विकल्या गेली.
विक्रेत्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जानेवारी महिन्यात थोक बाजारात ७५-७६ रूपये प्रति किलो विकल्या गेलेल्या बेस्ट फटका तुर डाळीच्या भावात वाढ झाली आहे. मिडीयम क्वालिटी तुरीच्या डाळीतही जानेवारी महिन्यात वाढ झाली आहे. गुरूवारी ही डाळ सात हजार ६०० ते सात हजार ८०० रूपये क्विंटल विकल्या गेली. विशेष म्हणजे भाववाढीचे हे परिणाम चना, उडीज, बरबटीच्या डाळीवरही जाणवले. (शहर प्रतिनिधी)

Web Title: The pulse 'out' from the grocery list

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.