वित्त पुरवठा आराखडा पुस्तिकेचे प्रकाशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2018 21:50 IST2018-12-23T21:50:33+5:302018-12-23T21:50:56+5:30
जिल्हास्तरीय सल्लागार समितीची बैठक नुकतीच जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात पार पडली असून या सभेत जिल्हाधिकारी डॉ. कांदबरी बलकवडे यांच्या हस्ते नाबार्डच्या संभाव्य वित्त पुरवठा आराखडा पुस्तीकेचे प्रकाशन करण्यात आले.

वित्त पुरवठा आराखडा पुस्तिकेचे प्रकाशन
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्हास्तरीय सल्लागार समितीची बैठक नुकतीच जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात पार पडली असून या सभेत जिल्हाधिकारी डॉ. कांदबरी बलकवडे यांच्या हस्ते नाबार्डच्या संभाव्य वित्त पुरवठा आराखडा पुस्तीकेचे प्रकाशन करण्यात आले.
सभेच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी डॉ. बलकवडे होत्या. यावेळी रिजर्व्ह बँकेचे प्रबंधक अनील मेंढे, जिल्हा अग्रनी प्रबंधक दिलीपकुमार सिल्लारे, नाबार्ड जिल्हा विकास प्रबंधक नीरज जागरे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक शंतनु मुंडे, जिल्हा निबंधक कांबळे, निवासी जिल्हाधिकारी हरीष धार्मीक व आरसेटी संचालक रवींद्र रिंगनगावकर, बँकर्स व सर्व शासकीय विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
सभेत नाबार्डने सादर केलेल्या सदर आराखड्यावर चर्चा करून सर्व बँकांनी आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करावी असे जिल्हाधिकारी डॉ. बलकवडे यांनी सांगीतले. दरम्यान त्यांच्या हस्ते संभाव्य आराखडा पुस्तीकेचे प्रकाशन करण्यात आले.
नाबार्डने सादर केलेल्या संभाव्य वित्त पुरवठा आराखड्यामध्ये शेती व शेतीपुरक क्षेत्रासाठी ८८९.५२ कोटी, शेती यांत्रीकीकरणासाठी ४१.४० कोटी, पशुसंवर्धन संबंधीत क्षेत्र दुग्ध व्यवसायासाठी ५१.८९ कोटी, कुक्कुटपालनसाठी ८.३६ कोटी, शेळी मेंढी पालनासाठी १४.४० कोटी, गोदाम व शीतगृहासाठी ४७.२३ कोटी, भुवीकासासाठी ९.३१ कोटी, सिंचनासाठी ३४.८४ कोटी, शिक्षण व गृहकर्जासाठी २१२.४० कोटी, महिला बचत गट विकासासाठी ११.१६ कोेटी वित्त पुरवठा प्रस्तावित केला आहे.