आरोग्य अधिकाऱ्याचे अश्लील चाळे
By Admin | Updated: September 9, 2016 02:05 IST2016-09-09T02:05:08+5:302016-09-09T02:05:08+5:30
तालुक्यातील रुग्णांना रुग्णसेवा तत्परतेने मिळावे यासाठी शासनाकडून योजनांचा पिटारा रुग्णालयांना देण्यात येत आहे.

आरोग्य अधिकाऱ्याचे अश्लील चाळे
बनगाव आरोग्य केंद्रातील प्रकार : कर्मचाऱ्यांची डीएचओकडे तक्रार
आमगाव : तालुक्यातील रुग्णांना रुग्णसेवा तत्परतेने मिळावे यासाठी शासनाकडून योजनांचा पिटारा रुग्णालयांना देण्यात येत आहे. परंतु या योजनांना सार्थक करण्यासाठी असलेली यंत्रणा कुचकामी ठरत आहे. अधिकारी स्वत:चे कर्तव्याचे पालन करण्याऐवजी बनगाव आरोग्य केंद्रात अश्लील चाळे करतात, अशी तक्रार कर्मचाऱ्यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी यांना केली आहे.
ग्रामीण नागरिकांना तत्काळ रुग्णसेवा मिळावी यासाठी आमगाव येथील बनगाव प्राथमिक उपचार केंद्र शासनाने सुरू केले. रुग्णेसेवेसाठी तत्पर असलेले रुग्णालय सध्या नवीन वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या वर्तणुकीमुळे वादग्रस्त ठरले आहे.
आमगाव येथे अस्थाई स्वरुपात असलेले बनगाव प्राथमिक आरोग्य केंद्र येथे वैद्यकीय अधिकारी गगन गुप्ता यांनी कार्यभार सांभाळला आहे. त्यांच्या कार्यवृत्तीला जेमतेम रुग्णसेवेला हात लागल्याने आपली वर्तवणुकीत बदल घडवित मर्जीतील अधिपरिचारिका यांना सोबती करुन अन्य कर्मचाऱ्यांना धारेवर धरले. त्यामुळे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी शिस्तपालनाची जबाबदारी न घेता स्वत:चा रुबाब दाखवित खास अधिपरिचारिका यांना हमखास आश्रम देत आरोग्य केंद्रातील रुग्णसेवेला वेशीला टांगले. रुग्णसेवा देण्याऐवजी गुप्ता यांनी आपल्या मर्जीतील अधिपरिचारिकांना स्वत:च्या कक्षात बोलावून असभ्य वर्तवणूक करीत असल्याचे गंभीर आरोप कर्मचाऱ्यांनी केले. यासंदर्भात वरिष्ठांना तक्रार करण्यात आली आहे. रुग्णालयात कायद्यातील तरतूदीनुसार असलेली वैद्यकीय गर्भपात करण्यासाठी रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी यांच्या ऐवजी अधि परिचारिकाकडून गर्भपात करण्याची कामे केली जातात. याच गर्भपातासाठी रुग्णांकडून दोन हजार ते तीन हजार रुपये घेण्यात येतात. डॉ. गगन गुप्ता यावेळी आपले कर्तव्य बजावण्याऐवजी ग्रामीण रुग्णालयात आराम करतात. त्यामुळे रुग्णसेवा सलाईनवर आहे.
वैद्यकीय अधिकारी गगन गुप्ता यांच्या असभ्य वर्तवणुकीने रुग्णसेवा खंडीत झाली आहे. कर्मचाऱ्यांसोबत द्वेषपूर्ण वागणुकीने कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष आहे. डॉ. गुप्ता यांच्या अशोभनीय कृत्याची लेखी तक्रार कर्मचाऱ्यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे केली आहे. त्यामुळे या आरोग्य केंद्रातील कारभार चव्हाट्यावर आला आहे. डॉ. गुप्ता, परिचारिका सी.आर. सूर्यवंशी, एल.पी. चन्ने, वाहन चालक यांच्यावर कारवाई करण्याची मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)
डॉ.गुप्ता यांच्यावर गंभीर आरोप
बनगाव प्राथमिक आरोग्य केंद्र येथे कार्यरत वैद्यकीय अधिकारी गगन गुप्ता यांच्यावर रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी वरिष्ठांना लेखी गंभीर आरोप केले आहेत. डॉ. गुप्ता स्वत:च्या कक्षात अधिपरिचारिका यांच्यासोबत अश्लील चाळे करतात. रुग्णालयातील कर्तव्य सोडून ग्रामीण रुग्णालयात आश्रय घेतात. नमुने तपासनी करीता वाहन उपलब्ध करीत नाहीत. रुग्णांना अॅम्बुलेन्स सेवा देत नाहीत, वैद्यकीय प्रमाणपत्रासाठी ५०० ते ३००० रुपये घेतात असे अनेक गंभीर आरोप लेखी निवेदनात केले आहे. परंतु वरिष्ठांच्या आश्रयामुळे या आरोपांची चौकशी होणार किंवा नाही अशी शंका अन्यायग्रस्त कर्मचाऱ्यांना येते.
अधिपरिचारिका गायधने यांच्या आत्महत्येत हलगर्जीपणा
याच आरोग्य केंद्रातील कंत्राटी अधिपरिचारिका आर.एम. गायधने यांनी १२ आॅगस्टला आत्महत्या केली. या आत्महत्ये प्रकरणी डॉ. गुप्तां यांनी हलगर्जी केली आहे. त्यांनी आरोग्य केंद्रातील अनैतिक संबंधांना चालना दिली. त्यामुळेच अधिपरिचारिका गायधने यांनी आत्महत्या केल्याची बाब कर्मचाऱ्यांनी तक्रारीत नमुद केली आहे.