शहरं
Join us  
Trending Stories
1
किश्तवाड येथे धरालीसारखी दुर्घटना, ढगफुटी होऊन आला पूर, १० जणांचा मृत्यू
2
'अमेरिकाच नाही, संपूर्ण जग तुमचे ऐकेल', गडकरींनी भारत विश्वगुरु बनण्याचा मास्टर प्लॅन सांगितला
3
मतदार यादीतून काढलेल्या ६५ लाख लोकांची नावे सार्वजनिक करा; SC चे निवडणूक आयोगाला निर्देश
4
ट्रम्प यांनी डेड इकॉनॉमी म्हटलेलं, आता अमेरिकेच्याच एजन्सीनं भारताचं रेटिंग केलं अपग्रेड
5
किश्तवाड ढगफुटी: फारुख अब्दुल्ला म्हणाले, "संपूर्ण देशाने देवाकडे प्रार्थना करावी, बचाव कार्यही कठीण!"
6
'लव्ह अँड वॉर', 'अल्फा'च नाही तर आलिया भट आणखी एका सिनेमाच्या तयारित, वाचा सविस्तर
7
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
8
"मूल जन्माला घाला आणि ६ लाख रुपये मिळवा"; चीनला टक्कर देत 'या' देशाने केली मोठी घोषणा!
9
इथेनॉलनंतर आता डिझेलमध्ये बायोफ्युएल मिसळणार; गडकरींनी वादाच्या पार्श्वभूमीवर केली घोषणा
10
Independence Day 2025: काय योगायोग...! १९४७ ला तोच वार होता, जो उद्या १५ ऑगस्टला...; ७८ वर्षांनी...
11
२ मुलांना घेऊन आईनं मारली नदीत उडी; पतीच्या निधनानंतर दीराशी केले होते लग्न, मात्र...
12
तो कोहलीमुळं खचला! खरंच हेच असेल का पाकचा 'बब्बर शेर' प्रत्येक मॅचमध्ये 'ढेर' होण्यामागचं कारण?
13
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज! ८वा वेतन आयोग कधी लागू होणार? सरकारचा मोठा खुलासा!
14
इन्स्टाग्रामवर १.२ मिलियन फॉलोअर्स, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीनं केली अटक; कोण आहे 'ही' मॉडेल?
15
बस बनवणाऱ्या कंपनीला ₹५९४ कोटींचा नफा; शेअर खरेदीसाठी उड्या, ₹१२१ वर आला भाव
16
८८१ किमी केवळ १२ तासांत; ‘ही’ देशातील सर्वांत लांब अंतराची वंदे भारत, किती स्पीडने जाते?
17
२० वर्षे पगार दिला, पण नोकरीवर काही काम करू दिले नाही! नाराज महिला कंपनीविरोधात गेली कोर्टात, म्हणाली...
18
नीरज चोप्राची पत्नी हिमानी मोरचा मोठा निर्णय! टेनिसला कायमचा रामराम, 'या' व्यवसायात घेतली उडी
19
कोणत्या धर्माचं पालन करते सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया चांडोक? किती शिकलीये? जाणून घ्या
20
कबुतरखाना वाद: मध्यस्थीचा प्रस्ताव देणाऱ्या जैन मुनींना राज ठाकरेंचं थेट उत्तर; म्हणाले...

वणवा थांबविण्यासाठी जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 21:15 IST

दरवर्षी एप्रिल व मे महिन्यात जंगलात आग लागण्याचे प्रकरण मोठ्या प्रमाणावर घडत असतात. यामुळे जंगलातील लाख मोलाच्या संपत्तीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. तसेच जंगलात वास्तव्यात असलेल्या वन्य प्राण्यांसह हजारो जीव- जंतू व पक्ष्यांच्या जीवाला सुद्धा धोका निर्माण होतो.

ठळक मुद्देवन व्यवस्थापन समितीचा पुढाकार : नागरिकांना वन कायद्याची दिली माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : दरवर्षी एप्रिल व मे महिन्यात जंगलातआग लागण्याचे प्रकरण मोठ्या प्रमाणावर घडत असतात. यामुळे जंगलातील लाख मोलाच्या संपत्तीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. तसेच जंगलात वास्तव्यात असलेल्या वन्य प्राण्यांसह हजारो जीव- जंतू व पक्ष्यांच्या जीवाला सुद्धा धोका निर्माण होतो. या सर्व बाबी लक्षात घेता वन विभाग आणि संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या संयुक्त विद्यमाने जंगलातील वनवा थांबविण्यासाठी जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे.येथील वन परिक्षेत्राधिकारी कार्यालयाच्या सहकार्याने संयुक्त वन व्यवस्थापन समिती (नवाटोला) तसेच बिजेपार येथील समिती गावागावात जाऊन लोकांशी संपर्क करीत गावात सभा व बैठका आयोजित करुन गावकऱ्यांना समजाविण्याचा पुरेपुर प्रयत्न करीत आहेत.जंगलाला वनवा लागला तर वन संपत्तीचे मोठे नुकसान होते. याचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष फटका मानवी जीवनावर सुद्धा पडतो आणि वनोपजावर अवलंबित गावांना याचा परिणाम सुद्धा भोगावा लागतो. कारण की वनातून मिळणाºया उत्पादनापासून अनेकांना रोजगार सुद्धा मिळतो. परंतु काही लोक वन संपत्तीचा महत्व न समजता वनात आग लावण्याची चूक करतात याबाबत समजाविले जात आहे.वन व्यवस्थापन समिती आणि वनकर्मचारी, वनात आग लावणे कायद्यान्वये गुन्हा असून गुन्हा सिद्ध झाल्यास आरोपी शिक्षेस पात्र ठरु शकतो. अशात लोकांनी कायद्याचे उलंघन करु नये याबाबतही समजावून सांगत आहेत.जनजागृती करणाऱ्यांमध्ये संयुक्त वन व्यवस्थापन समिती नवाटोलाचे अध्यक्ष गोविंद मरस्कोल्हे, सचिव (वनरक्षक) सुरेश रहांगडाले, कोषाध्यक्ष संतोष कोडवती, सदस्य महेश वरकडे व इतर सदस्य सहकार्य करीत आहेत. याशिवाय नवाटोला येथील काही सुज्ञ नागरिक सुद्धा इतर गावातील अनेक लोकांना आग लागल्यापासून जंगलाना वाचविण्याचे आवाहन करीत आहेत. त्याचप्रमाणे बिजेपार परिसरातील समितीचे लोक आणि वन कर्मचारी सुद्धा गावागावात जनजागृती करीत आहेत.ती आग विझविण्यात यशमागील आठवड्यात एफडीसीएमच्या कक्ष क्र.४६५ मध्ये मोठ्या प्रमाणात आग लागण्याची घटना घडली. परंतु संयुक्त वन व्यवस्थापन समिती आणि वन विभाग तसेच एफडीसीएमच्या कर्मचाºयांनी मिळून आगीवर नियंत्रण मिळवित आग विझविली व मोठे नुकसान टाळले. या मोहिमेत गावातील लोकांनी सुद्धा सहकार्य केले.कशामुळे लागतो वणवा?जंगलात मोहफुल वेचणारे लोक मोहाच्या झाडाखालील परिसरात स्वच्छ करण्यासाठी पालापाचोळा जाळतात. परंतु तो पाला पाचोळा जळताना संपूर्ण जंगलात आग पसरते. याशिवाय गुरे चारणारे किंवा वनोपज संकलित करण्यासाठी जंगलात भटकणारे लोक जंगलात आग लावण्यास कारणीभूत असतात. परंतु त्यांच्या छोट्याशा चुकीमुळे मोठ्या प्रमाणावर वनस्पती, किमती लाकडे आणि शेकडो वन्यजीवांना धोका निर्माण होतो. बिळात राहणारे व सरपटणारे जीव आपला प्राण गमावून बसतात. आगीत हिरवी वनस्पतीसुद्धा जळून गेल्याने एकीकडे झाडांचे नुकसान होतो तर त्यासोबतच तृणभक्षी प्राण्यांचा चारा सुद्धा हिरावतो.

टॅग्स :forestजंगलfireआग