वेगळ्या विदर्भासाठी कलापथकाद्वारे जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2016 01:51 IST2016-07-29T01:51:13+5:302016-07-29T01:51:13+5:30
वेगळ्या विदर्भ राज्याचे महत्व त्याचे फायदे सहजरित्या लोकांना समजावे व लोक एक संघटीत व्हावे म्हणून ...

वेगळ्या विदर्भासाठी कलापथकाद्वारे जनजागृती
तुमसर : वेगळ्या विदर्भ राज्याचे महत्व त्याचे फायदे सहजरित्या लोकांना समजावे व लोक एक संघटीत व्हावे म्हणून विदर्भराज्य आघाडीतर्फे तालुक्यातील गावा गावात कलापथके तसेच नुक्कड नाटकाचे सादरीकरण करून लोकांना वेगळ्या विदर्भासाठी प्रेरित करण्याकरिता अनोखी जनजागृती करणे सुरू आहे.
चारगाव येथील रहिवासी रामप्रसाद बनसोड यांच्या निर्देशनात तसेच डॉ. गोविंद कोडवानी यांच्या संयोजनात तालुक्यातील चांदपुर देवस्थान, सिहोरा, हरदोली, नाकाडोंगरी, मिटेवानी, देव्हाडी आदी ठिकाणी नुक्कड नाटकाचे तसेच कलापथकाद्वारे विदर्भाच्या गितावर नृत्य सादरीकरण करण्यात आले.
यात लोडशेडिंग, पर्यटन व शेतकरी आत्महत्या आदीबाबद हृदयस्पर्शी नाटक सादर करून लोकांना विदर्भासाठी एकजुट होण्याचे संदेश दिल्या गेले. त्यादरम्यान विशआचे मुख्य संघटक नरेंद्र पालांदुरकर, वि.रा. युवा आघाडीचे नेहा पालांदुरकर यांनी आपल्या प्रभावी शैलीत लोकांना विदर्भाचे फायदे समजविल्याने नागरिक पृथक विदर्भाचे समथृन करित आहे.या अनोखी जनजागृतीला कांचन कोडवानी, उमेश राणे, कैलाश तितिरमारे, डॉ. रुद्रसेन भजनकर, स्वाती सिकुटला, सतीश पटले, जय ठाकूर, पवनी तिवारी, राकेश भाष्कर, गोलू गुप्ता, डोंगरे आदींनी प्रयत्न केले. (शहर प्रतिनिधी)