परमात्मा सेवक एक मंडळाने केली जनजागृती
By Admin | Updated: December 30, 2016 00:57 IST2016-12-30T00:57:23+5:302016-12-30T00:57:23+5:30
महान त्यागी बाबा जुमदेव यांच्या शिकवणीप्रमाणे परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ डोंगरगाव सडक...

परमात्मा सेवक एक मंडळाने केली जनजागृती
शेंडा (कोयलारी) : महान त्यागी बाबा जुमदेव यांच्या शिकवणीप्रमाणे परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ डोंगरगाव सडक व शाखा शेंडाच्या वतीने शुक्रवारी समाज भवनाच्या पटांगणावर जनजागृती श कशी होईल, याचा परिचय देवून सुखमय जीवन जगता यावे यासाठी व्यसन, अंधश्रद्धा यासारख्या वाईट मार्गापासून दूर राहून मोक्ष प्राप्तीकडे वाटचाल करावे, असे विचार मांडण्यात आले.
उद्घाटन जयपाल गहाणे यांच्या हस्ते, विजय भोंडे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून देवानंद मेश्राम, परसराम सलामे, डोंबके, टिकाराम भेंडारकर, अरविंद गायधने, अल्लाउद्दीन राजानी, मार्कंड परिहार, पवन टेकाम, नेरश शेंडे, पोलीस पाटील मोहनलाल बोरकर, पंढरीनाथ लांजेवार, तुळशीराम ठलाल, नत्थू ठाकरे, आसाराम वट्टी, श्रीपत थेर, इंदल वाघाडे, रामकृष्ण मेंढे, नरेंद्र मेश्राम, हंसाराम पंधरे, विठ्ठल नेवारे, गोपाल मेश्राम, मुलचंद पंधरे, महादेव ठाकरे व इतर मान्यवर उपस्थित होते.
सर्व प्रथम शक्तीचे प्रतिक वीर बजरंगबली यांच्या प्रतिमेचे पूजन करुन माल्यार्पण करण्यात आले. नंतर सकाळी सामूहिक हवन कार्य, शोभायात्रा, चर्चा बैठक, महाप्रसाद व रात्री भजनाचा कार्यक्रम घेण्यात आला.
कार्यकमाला उपस्थित मान्यवरांनी आपल्या अनुभवातून दु:खी, गरीबी, अज्ञान, व्यसन तसेच अंधश्रद्धेपासून मुक्ततेसाठी स्वत:पासून सुरुवात करावी. त्यानंतर त्याबाबत जनजागृती करुन इतरांना सल्ला द्यावा, असा संदेश दिला. संचालन वसंता येरणे यांंनी केले. कार्यक्रमासाठी परिसरातील सेवक मंडळींनी सहकार्य केले. (वार्ताहर)