डिमांड भरलेल्या शेतकऱ्यांना त्वरीत वीज जोडणी द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2019 06:00 AM2019-12-15T06:00:00+5:302019-12-15T06:00:23+5:30

शेतकऱ्यांना दुष्काळी परिस्थितीला तोंड द्यावे लागत आहे. विज वितरण कंपनीच्या लेटलतीफ धोरणाचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. यावर तीव्र नाराजी व्यक्त करीत आ.सहषराम कोरोटे यांनी डिमांड भरलेल्या शेतकऱ्यांना त्वरीत जोडणी करुन देण्याचे निर्देश दिले. तसेच कामात कामचुकारपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाही करण्याचे निर्देश दिले.

Provide quick power connection to demanded farmers | डिमांड भरलेल्या शेतकऱ्यांना त्वरीत वीज जोडणी द्या

डिमांड भरलेल्या शेतकऱ्यांना त्वरीत वीज जोडणी द्या

googlenewsNext
ठळक मुद्देसहषराम कोरोटे। आढावा बैठकीत दिले निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्क
सालेकसा : देवरी विधानसभा क्षेत्रातील अनेक शेतकऱ्यांनी कृषी पंपाच्या जोडणीसाठी डिमांड भरले. मात्र बराच कालावधी लोटूनही त्यांना अद्यापही विद्युत जोडणी करुन देण्यात आली नाही. परिणामी शेतकऱ्यांना दुष्काळी परिस्थितीला तोंड द्यावे लागत आहे. विज वितरण कंपनीच्या लेटलतीफ धोरणाचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. यावर तीव्र नाराजी व्यक्त करीत आ.सहषराम कोरोटे यांनी डिमांड भरलेल्या शेतकऱ्यांना त्वरीत जोडणी करुन देण्याचे निर्देश दिले. तसेच कामात कामचुकारपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाही करण्याचे निर्देश दिले.
येथील तहसील कार्यालयात शुक्रवारी विविध विभागांची आढावा बैठक घेतली. या बैठकीत उपस्थित अधिकाºयांना निर्देश देताना ते बोलत होते. बैठकीला माजी मंत्री भरत बहेकार, पं.स.सभापती अर्चना राऊत, जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष पुरुषोत्तम कटरे, माजी जि.प.अध्यक्ष उषा मेंढे, तालुका अध्यक्ष वासुदेव चुटे, शिवसेना जिल्हा उपाध्यक्ष सोहन क्षीरसागर, रॉका तालुका अध्यक्ष तुकाराम बोहरे, बांधकाम सभापती उमेदलाल जैतवार, जिल्हा काँग्रेस महासचिव लखनलाल अग्रवाल, पं.स.सदस्य भरतलाल लिल्हारे, लक्ष्मण नागपुरे, कैलास अग्रवाल, प.स.सदस्य परिहार, यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. आ. कोरोटे यांनी सुरूवातीला विविध विभागांचा आढावा अधिकाऱ्यांकडून घेतला. आढावा देतांना अनेक त्रृट्या समोर आल्या. पंचायत समितीमार्फत मुंडीपार ग्रामपंचायतचे ग्रामसेवक हे पंचायत समिती सभापती उपसरपंच यांना विश्वासात न घेता मनमर्जीने कामे करण्याच्या आरोप उपस्थित आढावा बैठकीत सभापती अर्चना राऊत व विनोद अग्रवाल यांनी केला.यावर कोरोटे यांनी प्रत्यक्षात गटविकास अधिकारी यांना बोलावून मुंडीपार येथील ग्रामसेवकाला हटवून दुसºया ठिकाणी स्थानांतर करण्याचे निर्देश बीडीयो एस.टी.तुरकर यांना दिले. सोमवारपर्यंत बदली करण्याचे आदेश दिले.
या वेळी त्यांनी शासकीय कार्यालयांमध्ये कामासाठी येणाऱ्या नागरिकांची कामे प्राधान्याने मार्गी करण्यास सांगितले. शासनातर्फे जनतेसाठी राबविण्यात येणाऱ्या योजना जनतेपर्यंत पोहचवू याचा त्यांना लाभ देण्याचे निर्देश दिले.

अनुउपस्थित अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस
आढावा बैठकीला उपस्थित राहण्याचे निर्देश सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले होते. मात्र यानंतरही काही विभागाचे अधिकारी अनुउपस्थित होते.अशा अधिकाऱ्यांची यादी तयार करुन त्यांना कारणे दाखवा नोटीस देण्याचे निर्देश आढावा बैठकीत आ.कोरोटे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले.

Web Title: Provide quick power connection to demanded farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :electricityवीज