शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: गोरेगावच्या नेस्को सेंटर ड्रग्ज पार्टीचं नागपूर कनेक्शन
3
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
4
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
5
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
6
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
7
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
8
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
9
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
10
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
11
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
12
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
13
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
14
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
15
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
16
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
17
टीसीएस प्रकरणात परकीय कट्टरपंथीयांकडून फंडिंग? पोलिस आयुक्तालयाचा ‘एनआयए’शी पत्रव्यवहार
18
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
19
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
20
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना जास्तीत जास्त खरीप पीक कर्ज द्या

By admin | Updated: May 9, 2016 01:52 IST

जिल्ह्यात २ लाख ३१ हजार खातेदार शेतकरी आहेत. मागील वर्षी केवळ ४४ हजार शेतकऱ्यांनाच बँकांनी खरीप पीक कर्ज वाटप केले होते.

विजय सूर्यवंशी यांचे निर्देश : बँक व्यवस्थापकांची कार्यशाळागोंदिया : जिल्ह्यात २ लाख ३१ हजार खातेदार शेतकरी आहेत. मागील वर्षी केवळ ४४ हजार शेतकऱ्यांनाच बँकांनी खरीप पीक कर्ज वाटप केले होते. हे प्रमाण जिल्ह्यातील शेतकऱ्यांची संख्या पाहता अत्यंत कमी असून राष्ट्रीयकृत बँकांनी जिल्ह्यातील जास्तीत जास्त खातेदार शेतकऱ्यांना खरीप पीक कर्जाचे वाटप करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी दिले.शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्ह्यातील बँक व्यवस्थापकांची कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी अध्यक्षस्थानावरुन मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या कार्यशाळेला जिल्हा उपनिबंधक दिग्वीजय अहेर, जिल्हा अग्रणी प्रबंधक अनिल श्रीवास्तव उपस्थित होते. डॉ.सूर्यवंशी म्हणाले, जिल्ह्यात शेतकऱ्यांना बँकाद्वारे जे कर्ज वाटप करण्यात येते. त्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा वाटा ६० टक्के तर राष्ट्रीयकृत बँकांचा वाटा ४० टक्के आहे. कर्जदार शेतकऱ्यांची संख्या लक्षात घेता ७५ टक्के शेतकऱ्यांना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक कर्ज वाटप करते. तर केवळ २५ टक्के शेतकऱ्यांना राष्ट्रीयकृत व ग्रामीण बँक कर्ज वाटप करते.कर्जदार व बिगर कर्जदार सभासद शेतकरी यांना कर्ज उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी राष्ट्रीयकृत बँक व ग्रामीण बँकांनी घ्यावी, असे सांगून डॉ.सूर्यवंशी म्हणाले, सन २०१६-१७ च्या खरीप हंगामात जिल्ह्यातील ५० हजार नवीन सभासद शेतकऱ्यांना कर्ज वाटप या बँकांनी करावे. कर्ज वाटपात सुलभता येण्यासाठी बँकांनी मंडळ स्तरावर कर्ज मेळावे घ्यावे. कर्ज घेण्यासाठी कोणते कागदपत्र आवश्यक आहे याची माहिती बँकांनी दर्शनी भागात लावावी. संबंधित शेतकऱ्यांना त्यामुळे कागदपत्रांची पुर्तता करुन कर्ज घेणे सोईचे होईल असेही सांगितले.सन २०१५-१६ च्या हंगामात जिल्ह्यातील १०९ गावांची अंतिम पैसेवारी ५० पैशापेक्षा कमी असल्याचे सांगितले. या गावातील शेतकऱ्यांनी घेतलेल्या कर्जाचे पुनर्गठण करुन त्या गावातील शेतकऱ्यांना कर्ज वाटप करावे. पंतप्रधान पीक विमा योजनेची माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवून त्यांना या योजनेत सहभागी करु न घ्यावे. बँकांमार्फत राबविण्यात येणाऱ्या केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ जिल्ह्यातील शेतकऱ्यांसह नागरिकांना देण्यासाठी बँकांच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सामाजिक उत्तरदायित्वातून काम करावे असेही डॉ.सूर्यवंशी म्हणाले. या कार्यशाळेला जिल्हा मध्यवर्ती बँकेचे, राष्ट्रीयकृत बँकेचे व ग्रामीण बँकेचे जिल्हा समन्वयक तसेच शाखा व्यवस्थापक यांची उपस्थिती होती. (तालुका प्रतिनिधी)