घरकुल योजनेतील अनुदान द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2021 04:16 IST2021-03-29T04:16:42+5:302021-03-29T04:16:42+5:30
गोरेगाव नगर पंचायत अंतर्गत कित्येक लाभार्थ्यांनी प्रधानमंत्री घरकुल योजनेंतर्गत आपल्या कच्च्या जुन्या घरांना तोडून पक्क्या घरांचे बांधकाम सन २०१९ ...

घरकुल योजनेतील अनुदान द्या
गोरेगाव नगर पंचायत अंतर्गत कित्येक लाभार्थ्यांनी प्रधानमंत्री घरकुल योजनेंतर्गत आपल्या कच्च्या जुन्या घरांना तोडून पक्क्या घरांचे बांधकाम सन २०१९ पासून सुरू केले आहे. यातील काही लाभार्थ्यांना अनुदान मिळाल्याने कुणी सज्जा तर कुणी स्लॅबपर्यंत बांधकाम करून घेतले आहे. काहींनी कर्ज घेऊनही बांधकाम केले आहे. मात्र या लाभार्थ्यांना केंद्र शासनाकडून अनुदानाची रक्कम मिळालेली नसल्याने आता लाभार्थी अडचणीत आले आहे. मध्यंतरी या प्रकरणी भाकपने नगर पंचायत मुख्याधिकारी तसेच म्हाडा अधिकाऱ्यांना पत्र पाठविले होते. मात्र त्यानंतरही केंद्र शासनाकडून निधी मिळालेला नाही. याबाबत खासदार सुनील मेंढे यांनाही कळविण्यात आले आहे. त्यात आता येत्या १० एप्रिलपर्यंत लाभार्थ्यांना उरलेली किश्त न मिळाल्यास तीव्र आंदोलन केले जाणार, असा इशारा भाकपचे हौसलाल रहांगडाले यांनी दिला आहे.