सॅनिटायझेशनसाठी ग्रामपंचायतींना १५व्या वित्त आयोगातून निधी द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 04:26 IST2021-04-26T04:26:06+5:302021-04-26T04:26:06+5:30
तिरोडा : शहरी भागासह ग्रामीण भागातही कोरोनाचा वेगाने प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे ग्रामीण भागात भीतीचे वातावरण आहे. कोरोनाचा संसर्ग ...

सॅनिटायझेशनसाठी ग्रामपंचायतींना १५व्या वित्त आयोगातून निधी द्या
तिरोडा : शहरी भागासह ग्रामीण भागातही कोरोनाचा वेगाने प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे ग्रामीण भागात भीतीचे वातावरण आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी ग्रामीण भागात कोरोना चाचणी शिबिर लावण्याची गरज आहे. गावाचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी सॅनिटायझेशनची गरज आहे. यासाठी ग्रामपंचायतींना पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून निधी उपलब्ध करून देण्याची मागणी माजी आमदार दिलीप बन्सोड यांनी केली आहे.
गोंदिया जिल्ह्यातच कोरोनाचा संसर्ग शहरातच नव्हे तर ग्रामीण भागात पण मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव वाढलेला आहे. ग्रामपंचायतीला जिल्हा परिषदेने सॅनेटायझरची फवारणी करण्यास सूृचना केलेली आहे. परंतु ग्रामपंचायतीकडे निधी उपलब्ध नसल्याची माहिती आहे. खासदार सुनील मेंढे हे आढावा बैठक घेत आहेत. तेव्हा त्यांनी आढावा घेण्यापेक्षा पंतप्रधान यांना विनंती करून १५व्या वित्त आयोगाच्या निधीमधून ग्रामपंचायतीला सॅनिटायझेशन करण्यासाठी परवानगी मिळवून द्यावी. त्यांनी आढावा घेतल्यानंतर अजूनही रेमडेसिविर इंजेक्शन आपण प्राप्त करवू शकलेलो नाही. तीपण व्यवस्था करावी. तसेच जिल्हाधिकारी श्री. मीना तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. डांगे यांनी सॅनिटायझरबाबत गंभीर विचार करून ग्रामीण व शहरी भागांत फवारणी करण्याकरिता १५ व्या वित्त आयोगामधून किंवा कोविड व्यवस्थेकरिता राज्य शासनाकडून आलेल्या निधीमधून किंवा डी.पी.सी.मधून निधीची व्यवस्था करावी. केवळ ऑक्सिजन व रेमडेसिविर इंजेक्शन वाटून त्यावरच अवलंबून राहू नये, अशी मागणी माजी आमदार दिलीप बन्सोड यांनी केली.
गोंदिया जिल्ह्यातच कोरोनाच्या संसर्ग शहरातच नव्हे तर ग्रामीण भागात पण मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव वाढलेला आहे. ग्रामपंचायतीला जिल्हा परिषदेने सॅनेटायझरची फवारणी करण्यास सूृचना केलेली आहे; परंतु ग्रामपंचायतीकडे निधी उपलब्ध नसल्याची माहिती आहे. खासदार सुनील मेंढे हे आढावा बैठक घेत आहेत. तेव्हा त्यांनी आढावा घेण्यापेक्षा पंतप्रधान यांना विनंती करून १५व्या वित्त आयोगाच्या निधीमधून ग्रामपंचायतीला सॅनिटायझेशन करण्यासाठी परवानगी मिळवून द्यावी. त्यांनी आढावा घेतल्यानंतर रेमडेसिविर इंजेक्शन आपणास प्राप्त झालेली नाही. तीपण व्यवस्था करावी. जिल्हाधिकारी मीना व मुख्य कार्यकारी अधिकारी डांगे यांनी सॅनिटायझरबाबत गंभीर विचार करून ग्रामीण व शहरी भागांत फवारणी करण्याकरिता १५ व्या वित्त आयोगामधून किंवा कोविड व्यवस्थेकरिता राज्य शासनाकडून आलेल्या निधीमधून किंवा डीपीसीमधून निधीची व्यवस्था करावी. केवळ ऑक्सिजनवरच अवलंबून राहू नये, अशी मागणी माजी आमदार दिलीप बन्सोड यांनी केली आहे.