शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : Video - "दहशतवादी हल्ल्यानंतर काँग्रेसचं भ्याड सरकार जगभर रडायचं, आज पाकिस्तान रडतंय..."
2
संजय राऊतांची प्रकाश आंबेडकरांवर बोचरी टीका; "ते महिलेचा अपमान करत असतील तर..."
3
माझ्या कामातून, सेवेतून जनतेचा विश्वास सार्थ करून दाखवेन; सुनेत्रा पवारांचं आवाहन
4
"मुलीला बाहेर काढण्यासाठी कानाखाली मारली"; अविनाश जाधवांनी मारहाण केल्याचे CCTV फुटेज समोर
5
केंब्रिजमधून M. Phil, राहण्यासाठी घर नाही, स्वत:ची कारही नाही, एवढी आहे राहुल गांधींची संपत्ती 
6
"रोज उशिरा येतेस..."; मुख्याध्यापिकेने अडवताच शिक्षिका संतापली, हाणामारीचा Video व्हायरल
7
Gautam Adani : श्रीलंका, ऑस्ट्रेलिया आणि इस्रायलनंतर आता अदानींनी फिलिपिन्सकडे मोर्चा वळवला, काय आहे प्लॅन?
8
काँग्रेसला आणखी एक धक्का! पक्षानं फंडिंग न दिल्यानं निवडणूक लढण्यास उमेदवाराचा नकार
9
"मोदींनी स्वतःचं कुटुंब तरी कुठं सांभाळलं"; शरद पवारांचा पंतप्रधानांवर पलटवार
10
PHOTOS: IPL मध्ये पृथ्वीच्या गर्लफ्रेंडचा जलवा; स्टार खेळाडूला चीअर करताना दिसली निधी
11
"भाऊ वडिलांना अग्नी देत होता अन् मी हास्यजत्रेच्या...", प्रसाद ओकने सांगितला भावनिक प्रसंग
12
'...तर आफ्रिकेत जाऊन मतं मागा, कोकणातील शेतकरी लोकप्रतिनिधींवर संतप्त', त्या बॅनरची चर्चा
13
"स्मृती इराणींना निवडणुकीनंतर गोव्यात पाठवणार, गांधी परिवार कोणाला घाबरत नाही"
14
EPF Claim: किती दिवसांत मिळतो EPFO कडून क्लेम? ईपीएफनं म्हटलं, कमीतकमी लागतात 'इतके' दिवस
15
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
16
'नाच गं घुमा'मध्ये नम्रताचं काम पाहून प्राजक्ता माळी भारावली, म्हणाली -"हास्यजत्रेत ती गेली साडेपाच वर्ष..."
17
...म्हणून काँग्रेसने राहुल गांधींना अमेठी ऐवजी रायबरेलीतून दिली उमेदवारी, असं आहे मतांचं गणित
18
९ मे रोजी सुरू होत आहे वैशाख मास; रखरखीत उन्हाळ्यातही तो का ठरतो खास? वाचा!
19
Sara Tendulkar : सारा तेंडुलकर आता कोरियन ब्युटी ब्रँडची ॲम्बेसेडर; कोणत्या प्रोडक्टची करणार जाहिरात?
20
'कुछ कुछ होता हैं'साठी करणला मिळत नव्हती टीना; राणीपूर्वी तब्बल 8 अभिनेत्रींनी दिला होता नकार

उत्कृष्ट वैद्यकीय सेवा पुरवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2019 9:05 PM

योग्य उपचाराच्या आशेने गरीब रूग्ण येथे येतात. अशात त्यांना उत्कृष्ट वैद्यकीय सेवा पुरवा असे निर्देश जिल्ह्याचे पालक सचिव व वैद्यकीय शिक्षण सचिव डॉ. संजय मुखर्जी यांनी येथील वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिले.

ठळक मुद्देडॉ. मुखर्जी यांनी दिले निर्देश : वैद्यकीय महाविद्यालय व केटीएस रु ग्णालयाला भेट

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : योग्य उपचाराच्या आशेने गरीब रूग्ण येथे येतात. अशात त्यांना उत्कृष्ट वैद्यकीय सेवा पुरवा असे निर्देश जिल्ह्याचे पालक सचिव व वैद्यकीय शिक्षण सचिव डॉ. संजय मुखर्जी यांनी येथील वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिले.डॉ.मुखर्जी यांनी शनिवारी (दि.१५) येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि केटीएस जिल्हा सामान्य रु ग्णालयाला भेट देवून पाहणी केली असता वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसोबत त्यांनी संवाद साधला. यावेळी त्यांच्यासोबत जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.राजा दयानिधी, वैद्यकीय शिक्षण संचालक पी.टी.वाकोडे, अपर जिल्हाधिकारी अशोक लटारे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.विनायक रु खमोडे उपस्थित होते.याप्रसंगी त्यांनी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नव्यानेच बांधण्यात आलेल्या विद्यार्थी वर्ग व वाचन कक्षाची पाहणी करु न काही उपयुक्त सूचना केल्या.अतिदक्षता, टेलिमेडिसीन, दंतचिकित्सा, डायलेसीस, बाह्यरु ग्ण व आंतररु ग्ण विभागातील वॉर्ड क्रमांक १ व २ ला भेट देवून रु ग्णांशी संवाद साधला. याप्रसंगी डॉ. रूखमोडे यांनी, प्रत्येक बुधवारी प्रत्यक्ष मुलाखतीतून सहायक प्राध्यापक व निवासी डॉक्टरांची पदे भरण्यात येतात. परंतु या मुलाखतीला पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नसल्याची बाब सांगितली. तसेच बधिरीकरणशास्त्र विभागात चार डॉक्टरांची पदे भरण्याची विनंती त्यांनी केली.याबाबत लवकरच निर्णय घेवून पदभरती करण्यात येईल व स्थानिक पातळीवर सुद्धा भरती प्रक्रि या राबवावी अशी सूचना डॉ.मुखर्जी यांनी केली. यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विविध विभाग प्रमुख, सहायक प्राध्यापक, वैद्यकीय अधिकारी तसेच कर्मचारी उपस्थित होते.सिटी स्कॅ न मशीन नवीन इमारतीतया भेटीत डॉ.मुखर्जी यांनी केटीएस जिल्हा सामान्य रु ग्णालयात असलेल्या सिटी स्कॅन मशीन विभागाला भेट देवून पाहणी केली. त्यांनी नवीन येणारे सिटी स्कॅन मशीन नवीन इमारतीत लावण्याच्या सूचना यावेळी केल्या. तसेच बाई गंगाबाई शासकीय स्त्री रु ग्णालयाला भेट देवून परिसराची पाहणी करु न पावसाळ््याच्या दिवसात पाण्याचा निचरा योग्यप्रकारे करण्यात यावा यासाठी दोन अतिरिक्त मोटरपंप लावण्याचे निर्देश दिले. त्यामुळे वॉर्डांमध्ये पावसाळ््यात पाणी जाणार नाही व रु ग्णांचे हाल होणार नाही असे त्यांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारी