शेतकऱ्यांना भरपाई द्या
By Admin | Updated: November 5, 2015 02:12 IST2015-11-05T02:12:41+5:302015-11-05T02:12:41+5:30
शेतकऱ्यांच्या धानाला कीडीचा प्रादुर्भाव झाल्याने यावर्षीचे पिक धोक्यात आले आहे. त्यामुळे तातडीने सर्वेक्षण करून

शेतकऱ्यांना भरपाई द्या
गोंदिया : शेतकऱ्यांच्या धानाला कीडीचा प्रादुर्भाव झाल्याने यावर्षीचे पिक धोक्यात आले आहे. त्यामुळे तातडीने सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्या, अन्यथा आंदोलन छेडले जाईल, असा इशारा जिल्हा विकास आघाडीच्या वतीने देण्यात आला.
माजी जि.प. सदस्य संजय टेंभरे यांचा नेतृत्वात एका शिष्टमंडळाने उपविभागीय अधिकारी के.एन.के.राव यांना बुधवारी निवेदन दिले. भातपिकाची पैसेवारी यावर्षी ५० टक्केच्या वर आहे असे दाखविले आहे हे खरे आहे. परंतु पैसेवारी काढल्यानंतर कीडरोग (मावा, तुडतुडा) लागल्याने भात पीक बरेच नष्ट झाले आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. यासाठी शासनाने तत्काळ शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.
यावेळी लोधीटोलाचे सरपंच रतन बघेले, डॉ.मुन्ना तुरकर, चुटीयाचे उपसरपंच रामू शरणागत, हरीलाल गराकाटे, भरत तुरकर, उत्तम भगत, धनलाल गौतम, डोमाजी टेंभरे, तुलाराम दिहारी, टेकचंद बोपचे, तिलकचंद लांजेवार, कुवर येळे, घनश्याम चौधरी, सुरेंद्र तुरकर, रविंद्र तुरकर, अभिलेख खोब्रागडे, राजाराम अटरे, राजेश माहुले, भुवन लांजेवार, दुलीचंद कटरे, टेकचंद बोपचे, पितांबर भालाधरे, रामप्रसाद मारगाये, टिकाराम टेंभरे, रुपचंद शरणागत, कुवर शरणागत, कुंडलीक तुरकर, सुनील तुरकर, रमेश बिसेन, भाऊलाल टेंभरे, प्रेमलाल पटले, मुन्ना बिसेन, गोविंद माहुले, रामभाऊ कोसरे, हौसलाल गौतम, दिनेश राऊत, मुन्ना राऊत, धनलाल लांजेवार, महेश परसगाये आदी उपस्थित होते.(जिल्हा प्रतिनिधी)
महिला लोकशाही दिन
गोंदिया : येत्या १६ नोव्हेंबरला महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी महिलांच्या कोणत्याही विभागाशी संबंधित वैयक्तिक समस्या, गाऱ्हाणी, अडीअडचणी ऐकून घेऊन त्यांचे निवेदन स्विकारून त्यावर कार्यवाही केली जाणार आहे. सर्व महिला मंडळ बचतगट व इतर महिलांसाठी काम करणाऱ्या संस्था तसेच पिडीत महिलांनी आपले अर्ज आधीच तालुकास्तरावर कार्यालयात सादर करावे, असे प्र.जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांनी कळविले आहे.