आंबेडकरवादी संघटनांचा निषेध
By Admin | Updated: January 21, 2016 01:33 IST2016-01-21T01:33:24+5:302016-01-21T01:33:24+5:30
हैदराबादच्या सेंट्रल युनिव्हर्सिटीत बाबासाहेब आंबेडकर स्टुडन्ट्स असोसिएशनच्या पाच विद्यार्थ्यांचा सामाजिक बहिष्कार करून त्यांना होस्टेलमधून काढल्यानंतर रोहीत वेमुला ...

आंबेडकरवादी संघटनांचा निषेध
गोंदिया : हैदराबादच्या सेंट्रल युनिव्हर्सिटीत बाबासाहेब आंबेडकर स्टुडन्ट्स असोसिएशनच्या पाच विद्यार्थ्यांचा सामाजिक बहिष्कार करून त्यांना होस्टेलमधून काढल्यानंतर रोहीत वेमुला या विद्यार्थ्यांने आत्महत्या केली. त्याला आत्महत्येसाठी शासन-प्रशासनाने प्रवृत्त केल्याचा आरोप करीत या घटनेचा आंबेडकरवादी संघटनांनी बुधवारी तीव्र निषेध व्यक्त केला.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष अनिल सुखदेवे, संयोजक महेंद्र कठाने, समाज परिवर्तन संघाचे अध्यक्ष यशपाल डोंगरे यांच्या नेतृत्वात शहरातून मोर्चा काढून दोषींवर कारवाई करण्यासाठी राष्ट्रपदी व पंतप्रधानांच्या नावे निवेदन तहसीलदार संजय पवार यांना देण्यात आले. यावेळी अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)