शहरं
Join us  
Trending Stories
1
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
2
Exit Poll 2026: टुडेज चानक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
3
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
4
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
5
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
6
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
7
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
8
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
9
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
10
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
11
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
12
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
13
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
14
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
15
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ५ मे पासून 'या' भागांत ३० तास पाणीपुरवठा बंद; पाहा संपूर्ण यादी
17
Travel : मे महिन्याच्या उन्हातही अनुभवा डिसेंबरची थंडी! भारतातील 'या' थंडगार ठिकाणांना नक्की भेट द्या
18
पाकिस्तानचा 'डबल गेम', अमेरिकेच्या निर्बंधांना झुगारून इराणसाठी सुरू केले ६ व्यापारी भू-मार्ग
19
बंगालमध्ये त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्यास काँग्रेस ममता दीदींना पाठिंबा देणार? मल्लिकार्जुन खर्गे स्पष्टच बोलले
20
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
Daily Top 2Weekly Top 5

४५८ जलस्रोतांची कामे पूर्ण २२७ कामे प्रस्तावित

By admin | Updated: February 2, 2015 23:09 IST

पाण्याशिवाय शेती नाही, शेतीशिवाय अन्न नाही व अन्नाशिवाय जीवन नाही. याकरिता केंद्र व राज्यसरकारच्या कृषी विभागाने शेतकऱ्यांकरिता पाण्याचे स्त्रोत कसे तयार करता येतील,

काचेवानी : पाण्याशिवाय शेती नाही, शेतीशिवाय अन्न नाही व अन्नाशिवाय जीवन नाही. याकरिता केंद्र व राज्यसरकारच्या कृषी विभागाने शेतकऱ्यांकरिता पाण्याचे स्त्रोत कसे तयार करता येतील, पाणी कसे थांबवता येईल, पाण्याचा उपयोग शेतकऱ्यांना कशाप्रकारे देता व घेता येईल यासाठी विविध योजना तयार करून त्या क्रियान्वित केल्या. त्याचा उपयोग शेतकऱ्यांना खरच मिळाला आणि उत्पादनातही वाढ झाल्याचे या दशकाच्या उत्पादनावरून दिसून येते. मग्रारोहयो आणि राष्ट्रीय कृषी अभियानांतर्गत अनेक योजना आणि कामे राबविण्यात येत आहेत. जिल्हा पातळीपासून तर ग्रामीण पातळीपर्यंत अनेक विभागामार्फत वेगवेगळी कामे पूर्ण केले जात आहेत. यात कृषी विभाग समाविष्ट आहे. तिरोडा तालुका कृषी विभागाने शेतकऱ्यांना विविध माध्यमातून पाण्याची उपलब्धता व्हावी, अधिक वेळपर्यंत जमिनीत पाणी टिकून रहावे, पाण्याची पातळी वाढावी, गुरांना पाण्याची सोय उपलब्ध व्हावी अशा अनेक कारणांसाठी सन २००४-०५ ते २०१२-१३ या नऊ वर्षांत ४५८ पाण्याच्या स्त्रोतांची कामे पूर्ण केली आहेत. सन २०१४-१५ साठी २२७ कामे प्रस्तावित करण्यात आले असून त्यांना पूर्णत्वास नेण्याचे प्रयत्न केले जाईल, असे तालुका कृषी अधिकारी पी.व्ही. पोटदुखे यांनी सांगितले. तिरोडा तालुका कृषी विभागांतर्गत मग्रारोहयो आणि राष्ट्रीय कृषी अभियानांतर्गत करण्यात आलेल्या कामांमध्ये शेततळे १७४, बोडी खोलीकरण कामे १३६, सिनाबा (सिमेंट नाला बांध) १३३ आणि अन्य १५ कामे पूर्ण करण्यात आली आहेत. सन २०११-१२ या वर्षात सर्वाधिक एकूण १४३ कामे पूर्ण करण्यात आली आहेत. सन २००४-०५ या वर्षाला शेततळे (२०), बोडी खोलीकरण (९), सिनाबा (९), २००५-०६ या वर्षामध्ये शेततळे (१७), बोरवेल (८), सिनाबा (२७), मानाबा (३) असे एकूण ५५ कामे पूर्ण करण्यात आले. २००८-०९ मध्ये शेततळे (१०), बोडी खोलीकरण (१३), सिनाबा (११) असे एकूण ३४ कामे पूर्ण करण्यात आले. सन २०१०-११ या आर्थिक वर्षात शेततळे (३८), बोडी खोलीकरण (४९), सिनाबां (३४) आणि मानाबा (८) असे एकूण १२९ कामे पूर्ण करण्यात आले. सन २०११-१२ या आर्थिक वर्षात शेततळे (७७), बोडी खोलीकरण (३९), सिनाबां (३३) व मानाबां (२) असे एकूण १४३ कामे पूर्ण करण्यात आली आहेत. नऊ वर्षातून चार वर्षे वगळता पाच वर्षांत एकूण शेततळे (१७४), बोडी खोलीकरण (१३६), सिनाबां (१३३) आणि मानाबां (१५) असे ४५८ कामे पूर्ण करण्यात आली आहेत. या कामांतून शेतीला तसेच मानवी समस्येला पाण्याचा आधार मिळाला. यातून शेतकऱ्यांसह इतर प्राण्यांना पाण्याची उपलब्धता प्राप्त झाली. शेतकऱ्यांच्या शेतातील उत्पादनात भर पडली, असे कृषी विभागाने सांगितले आहे. (वार्ताहर)