कृषी ॲपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना योग्य सल्ला ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:36 IST2021-06-09T04:36:49+5:302021-06-09T04:36:49+5:30
बोंडगावदेवी : कृषी विभागाच्या कृषिक ॲपमध्ये हवामान, कृषी वार्ता, पशुसल्ला, डेअरी, कृषी सल्ला, बाजारभाव, कृषी गणकयंत्र, कृषकि तज्ज्ञ, उत्पादने, ...

कृषी ॲपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना योग्य सल्ला ()
बोंडगावदेवी : कृषी विभागाच्या कृषिक ॲपमध्ये हवामान, कृषी वार्ता, पशुसल्ला, डेअरी, कृषी सल्ला, बाजारभाव, कृषी गणकयंत्र, कृषकि तज्ज्ञ, उत्पादने, शंका, कृषी योजना, पीक मार्गदर्शन इत्यादी महत्त्वपूर्ण माहिती उपलब्ध आहे. शेतकरी बांधवांनी शेतीविषयक योग्य व अचूक मार्गदर्शनासाठी कृषी ॲपचा वापर करण्याचा सल्ला तालुका कृषी अधिकारी रवींद्र लांजेवार यांनी दिला आहे.
कृषी विभाग महाराष्ट्र शासन व कृषी विज्ञान केंद्र बारामती यांच्या संयुक्त विद्यमाने शेतीविषयक माहिती शेतकऱ्यांना सहज व सोप्या पद्धतीने उपलब्ध व्हावी यासाठी कृषिक ॲपची निर्मिती करण्यात आली आहे. कृषिक ॲप व्हाॅट्सॲप ग्रुपचे सदस्य होणे, बारामती कृषी विज्ञान केंद्र टोल फ्री नंबर शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे. शेतकऱ्यांचे आजघडीला रासायनिक खतांवरील होणारा खर्च १० टक्क्यांनी कमी होऊन उत्पादन खर्च कमी होण्यास मदत होणार. कृषीक ॲप हाताळण्यास शेतकरी बांधवांना अडचणी आल्यास तालुका कृषी अधिकारी कार्यालय तसेच कृषी सहायक यांच्याशी संपर्क साधावा.