शहरं
Join us  
Trending Stories
1
Mira Road Stabbing Case: घरातल्यांनी हाकललं, बायकोनंही सोडलं; आरोपी Zaib Zuber याच्या आयुष्यात याआधी काय घडलं?
2
Top Marathi News LIVE Updates: मस्साजोगच्या पोटनिवडणुकीत धक्कादायक निकाल; अश्विनी देशमुख पराभूत
3
Video - EVM मध्ये बिघाड झाल्याने मतदार संतापले; भाजपा नेत्यावर हल्ला, केला लाठीचार्ज
4
पंजाबविरुद्धच्या लढतीदरम्यान ड्रेसिंग रूमध्येच केलं स्मोकिंग, रियान पराग अडचणीत, व्हिडीओ व्हायरल
5
अनिल अंबानींच्या ३०३४ कोटींच्या संपत्तीवर टाच; फ्लॅटपासून ते फार्महाऊस पर्यंत काय काय जप्त?
6
महिलांना तालावर नाचायला लावणाऱ्या औषधाबाबत गूढ; भोंदू खरात नेमकं काय प्यायला द्यायचा?
7
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, सेन्सेक्स ३५० अंकांनी, तर निफ्टी १०० अंकांनी वधारला, 'या' शेअर्सवर आज नजर
8
ओपेक'मध्ये फूट! सौदीशी पंगा आणि इराणचा धोका; संयुक्त अरब अमिरातीने का सोडली जगाची 'तेल संघटना'?
9
PSL 2026: बाबर आझमचे वादळी शतक! तब्बल ७ वर्षांनी केला पुन्हा 'तो' पराक्रम; संघही फायनलमध्ये
10
उष्णतेचा दुहेरी तडाखा! दिवस आणि रात्रीही लाहीलाही; हवामान विभागाने दिला मोठा इशारा
11
डिजिटल पेमेंट, ट्रान्झॅक्शन, म्युच्युअल फंड.., १ मे पासून काय काय बदलणार? तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
12
मतदार छाननीत गडचिरोलीची आघाडी; मुंबईसह पुणे, ठाणे, नागपूर पिछाडीवर
13
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
14
उन्हामुळे शरीराचे ‘हे’ तीन अवयव होऊ शकतात निकामी; डॉक्टरांनी दिले ६ खास सल्ले, जाणून घ्या
15
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
16
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
17
पाणी येताच दारी, ‘लक्ष्मी’ आली घरी! दुर्गम सातपुड्यातील नागझरीमधील हाऱ्यापाड्यावरची अनोखी ‘जलकहाणी’
18
जर्मनीत अंतराळवीरांना १०० दिवसांचा एकांतवास! त्यांनी काही मोठा गुन्हा केला आहे का?
19
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
20
बापरे, हा काय प्रकार! हाय हिल्स घालून अक्षय कुमारचा 'लालपरी' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

अतिक्रमणास ग्रा.पं.चे प्रोत्साहन

By admin | Updated: November 18, 2014 22:58 IST

येथील वॉर्ड-५ मध्ये आमराई व मुलांच्या खेळण्याकरिता असलेल्या जागेवर ग्रामपंचायतची मालकी आहे. या जागेवर काही अतिक्रमणधारकांनी कब्जा केला असून यासाठी ग्रामपंचायतची मूकसंमती आहे.

अर्जुनी/मोरगाव : येथील वॉर्ड-५ मध्ये आमराई व मुलांच्या खेळण्याकरिता असलेल्या जागेवर ग्रामपंचायतची मालकी आहे. या जागेवर काही अतिक्रमणधारकांनी कब्जा केला असून यासाठी ग्रामपंचायतची मूकसंमती आहे. हे अतिक्रमण ताबडतोब काढून गावकऱ्यांसाठी ही जागा मोकळी करून देण्याची मागणी माजी उपसरपंच नामदेव चांदेवार व परशुराम शेंडे यांनी केली आहे. ग्रामपंचायतच्या मालकीची भूमापन क्रमांक ६० ची जागा खुली व पडीत होती. याठिकाणी दूरदर्शन टॉवरकरिता ग्रामपंचायततर्फे कार्यालय बांधकाम झाले. या व्यतिरीक्त काही लोकांचे अतिक्रमण आहे. यासंबधाने २४ फेब्रुवारी रोजी सरपंचाच्या अध्यक्षतेखाली १० सदस्यांच्या उपस्थितीत विशेष मासिक सभा घेण्यात आली. यात गट क्र. ६० च्या ग्रामपंचायत जागेवर सरहद भिंत बांधकामाविषयी चर्चा करण्यात आली. यावेळी या गटातील ०.६१ आर जागेवर असलेले अतिक्रमण सोडून सरहद भिंत बांधकामाचा ठराव घेण्यात आला. तर पश्चिम दिशेकडील अतिक्रमणधारक सदाशिव पुरोहित व ओम राठी यांच्या घरापासून ग्रा.पं. मालकीची पाच फूट जागा सोडून बांधकाम करावे, असा ठराव घेऊन सरहद भिंतीचे बांधकाम करण्यात आले. अगदी याच पध्दतीने हे बांधकाम झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ग्रा.पं. सदस्यांनी हा ठराव घेतला असला तरी ग्रामविकास अधिकाऱ्यांनी या ठरावात विरोध दर्शविणे आवश्यक होते. मात्र असा विरोध झाला नाही. यात बरीच मोठी आर्थिक उलाढाल झाल्याचा आरोप तक्रारकर्त्यांनी केला आहे. यासंदर्भात तक्रारकर्त्यांनी खंड विकास अधिकारी व सरपंच यांना सिमांकनाबाबतच्या दस्तावेजांची माहिती पटवून दिली. मात्र अद्यापही यावर कसलाच तोडगा काढण्यात आला नाही. अर्जुनी/मोरगाव ग्रामपंचायततर्फे या तऱ्हेने जागा दिली जात असेल तर गाववासीयांनी या गटात उर्वरित रिकाम्या जागेवर अतिक्रमण करून रितसर ग्रामपंचायतकडे अर्ज करण्याचे आवाहन तक्रारकर्त्यांनी एका पत्रकाव्दारे केले आहे. या प्रकरणी मुख्यमंत्री, विभागीय आयुक्त नागपूर, खासदार व मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली आहे. (तालुका प्रतिनिधी)