कॅँडलमार्च काढून नोंदविला निषेध
By Admin | Updated: March 11, 2016 02:21 IST2016-03-11T02:21:26+5:302016-03-11T02:21:26+5:30
एक्साईज ड्युटी मागे घेण्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या सराफा व्यवसायीकांच्या बेमुदत बंद अंतर्गत येथील सराफा असोसिएशनच्यावतीने

कॅँडलमार्च काढून नोंदविला निषेध
सराफा व्यवसायी उतरले रस्त्यावर : व्यवसायिकांचा बेमुदत बंद
गोंदिया : एक्साईज ड्युटी मागे घेण्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या सराफा व्यवसायीकांच्या बेमुदत बंद अंतर्गत येथील सराफा असोसिएशनच्यावतीने बुधवारी (दि.९) शहरात कँडलमार्च काढण्यात आले. यामाध्यातून सराफा व्यवसायीकांनी आपला शासनाप्रती आपला निषेध नोंदविला. तसेच सराफा व्यवसायीकांना गांधीगिरीचा मार्ग अवलंबत दुर्गा चौकात पुन्हा चहानाश्त्याची दुकान सुरू केली.
वित्तमंत्री अरूण जेटली यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदी-विक्रीवर १ टक्के एक्साईज ट्युटी लावली आहे. करिता शासनाने लावलेली एक्साईज ड्युटी मागे घेण्यात यावी या मागणीसाठी देशपातळीवर सराफा व्यवसायीकांनी बंद पुकारला आहे. अगोदर २, ३ व ४ मार्च पर्यंत असलेल्या या बंदला ७ मार्च पर्यंत वाढविण्यात आले होते. यादरम्यान महाराष्ट्र राज्य सराफा असोसिशएनची शासनासोबत चर्चा सुरू होती. मात्र सराफा व्यवसायीकांच्या मागणीवर तोडगा न निघाल्याने बेमुदत बंद पुकारण्यात आला.
या दरम्यान मात्र येथील सराफा असोसिशएनच्यावतीने गुरूवारी (दि.९) सायंकाळी शहरात कँडलमार्च काढण्यात आला होता. दुर्गा मंदिरातून काढण्यात आलेल हा कँडलमार्च बाजारभागातून निघाला. कँडलमार्चचा माध्यमातून सराफा व्यवसायीकांनी आपला शासनाप्रती आपला निषेध नोंदविला. सराफा व्यवसायीकांच्या या बंदमुळे सामान्य नागरिकांची मात्र फसगत होत आहे. (शहर प्रतिनिधी)