नाभिक समाजाकडून निषेध

By Admin | Updated: September 22, 2015 03:05 IST2015-09-22T03:05:20+5:302015-09-22T03:05:20+5:30

साकोली पंचायत समितीच्या गडकुुंभली मार्गावरील आबादीच्या जागेवरून नाभिक समाजाचे आराध्य दैवत संत

Prohibition from Nucleic Society | नाभिक समाजाकडून निषेध

नाभिक समाजाकडून निषेध

देवरी/सालेकसा : साकोली पंचायत समितीच्या गडकुुंभली मार्गावरील आबादीच्या जागेवरून नाभिक समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी सेनाजी महाराजांचे मंदिर अवमान करुन तोडण्यात आले. याप्रकरणी महाराष्ट्र नाभिक महामंडळ जिल्हा भंडारा आणि गोंदिया शाखेच्या वतीने प्रशासनाचा निषेध म्हणून १९ सप्टेंबरला भंडाराच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोठा मोर्चा काढण्यात आला.
२० वर्षापूर्वी ज्या प्रकारे अनेक नागरिकांनी घरे, बंगले आणि मंदिरे सुद्धा आबादीच्या जागेवर वसविली. त्याचप्रकारे साकोलीच्या नाभिक समाजाने घरे आणि बंगले तर नाही मात्र आराध्य दैवताची आठवण रहावी म्हणून त्या जागेवर छोटेसे संत सेनाजी महाराजांचे मंदिर बांधले होते.
आर्थिक व दुर्बल, असंघटीत नाभिक समाजाचा फायदा घेत १४ सप्टेंबरला अतिक्रमणच्या नावावर सदर मंदिर प्रशासनाने तोडले होते. त्या विरोधात १९ सप्टेंबरला भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील पाच हजाराच्या जवळपास नाभिक बांधवांनी एकत्र येऊन भंडाराच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी जिल्हाध्यक्ष मधुकर फुलबांधे, हेमंत मेश्राम, विजय घोटेकर, प्रभाकर फुलबांधे, अंबादास पाटील, पुंडलीकराव केळझरकर तसेच विभागातील आणि जिल्ह्यातील अनेक पदाधिकाऱ्यांनी नेतृत्व करुन शासनाचा निषेध नोंदविला.

Web Title: Prohibition from Nucleic Society