प्रोग्रेसिव्हचे विद्यार्थी जिल्हास्तरावर
By Admin | Updated: October 14, 2014 23:21 IST2014-10-14T23:21:12+5:302014-10-14T23:21:12+5:30
महाराष्ट्र राज्य क्रीडा विभागाव्दारे आयोजित तालुका स्तरावर मैदानी स्पर्धेमध्ये आपल्या उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून १४ वर्षे वयोगटातील प्रोग्रेसिव्ह शाळेच्या विद्यार्थ्यांनी विजय

प्रोग्रेसिव्हचे विद्यार्थी जिल्हास्तरावर
गोंदिया : महाराष्ट्र राज्य क्रीडा विभागाव्दारे आयोजित तालुका स्तरावर मैदानी स्पर्धेमध्ये आपल्या उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून १४ वर्षे वयोगटातील प्रोग्रेसिव्ह शाळेच्या विद्यार्थ्यांनी विजय मिळवून जिल्हास्तराच्या स्पर्धेत आपले स्थान निश्चित कले आहे.
यात १४ वर्षीय विद्यार्थ्यांच्या गटातून २०० मीटर दौडमध्ये प्रथम शुभम पडारे, ४०० मीटर दौडमध्ये प्रथम रोहीत नेताम, योगेश क्षीरपात्रे आणि व्दितीय मृणाल पटले, ६० मीटर दौड स्पर्धेत प्रथम भाग्यश्री घोनमोडे व व्दितीय प्रणाली शेंडे व रोहीत खोब्रागडे, १०० मीटर दौडमध्ये रोहीत नेताम व्दितीय क्रमांकावर राहिला.
हर्डल्स स्पर्धेेमध्ये प्रथम रुपेश देशमुख, संतोषी बागडे, भाग्यश्री घोनमाडे यांनी उत्कृष्ट विजय प्राप्त केला. उंच उडी स्पर्धेत अविनाश कडवने प्रथम क्रमांक मिळविला. थाली फेक स्पर्धेमध्ये प्रथम भावना पटले व व्दितीय क्रमांक भार्गवी चन्नेकरने मिळविला. १७ वर्षीय विद्यार्थ्यांच्या गटामध्ये ८०० मीटर दौड स्पर्धेत प्रथम श्रृतूजा पडोले, १०० मीटरमध्ये प्रथम नादिर सैय्यद, ४०० मीटरमध्ये व्दितीय जुही गुप्ता त्याचप्रमाणे १५०० मीटरमध्ये व्दितीय क्रमांक पल्लवी बिसेनने मिळविला.
हर्डल्स स्पर्धेत प्रथम नादीर सैय्यद, जुही गुप्ता तर व्दितीय क्रमांक श्रृतूजा पडोलेने मिळविला. थाली फेक स्पर्धेत प्रथम अभिजीत रघुवंशी, आचल पारधी तर व्दितीय क्रमांक प्राची कुथे, गोला फेक स्पर्धेत प्रथम क्रमांक अभिजीत रघुवंशी, श्रृती बंसोड, लांब उडी स्पर्धेत प्रथम अश्विन पटेल तर व्दितीय क्रमांक रोहीत माने याने मिळविला.
१९ वर्षे वयोगटात १०० मीटर दौड स्पर्धेत तुशार बिसेन प्रथम आणि रिषभ पहिरे द्वितीय, हर्डल्स स्पर्धेत प्रथम रिषभ पहिरे, तुषार बिसेन तसेच व्दितीय स्थानावर प्रणय शेंडे विजयी ठरला. थाली फेक स्पर्धेत प्रथम स्थानावर रिषीकेश हरडे आणि व्दितीय स्थानावर पूजा रहमतकरने विजय मिळविला. त्याचप्रमाणे रिले रेश स्पर्धेत वयोगट १४, १७ व १९ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांच्या प्रथम समुहात आपली जागा कायम ठेवण्याचे कार्य प्रोग्रेसिव्ह शाळेच्या विद्यार्थ्यांनी केले.
सर्व विजयी विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय शिक्षक व आपल्या आई-वडिलांना दिले.
सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक उमादेवी बहुउद्देशीय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष पंकज कटकवार, सचिव एन.आर. कटकवार, प्रोग्रेसिव्ह हिंदी हायस्कूलचे प्राचार्य ओ.टी. रहांगडाले, प्रोग्रेसिव्ह कॉन्वेंटच्या प्राचार्य कुमुदिनी तावाडे, आशा राव, विना कावळे, कृष्णा चौव्हाण, निधी व्यास, विलास नागदेवे, वर्षा सतदेवे, प्रमोद वाडी, बरखा कापगते, दुर्गा रामटेककर, मिना सार्वे, महेंद्र हरिणखेडे आणि क्रीडा प्रशिक्षक ज्योती बोरकर, हेमा नायडू, शाम फब्यानी, पंकज खैरे यांनी केले. (प्रतिनिधी)