समस्यांची सोडवणूक करणार
By Admin | Updated: April 26, 2017 00:44 IST2017-04-26T00:44:31+5:302017-04-26T00:44:31+5:30
मोहगाव व परिसरातील गावातील नागरिकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, रस्त्यांच्या अडचणी आणि विजेच्या समस्यांसह

समस्यांची सोडवणूक करणार
राजकुमार बडोले : कमरगाव रस्ता बांधकामाचे भूमिपूजन
गोंदिया : मोहगाव व परिसरातील गावातील नागरिकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, रस्त्यांच्या अडचणी आणि विजेच्या समस्यांसह अन्य समस्यांची सोडवणूक करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
शनिवारी (दि.२२) तालुक्यातील मोहगाव/तिल्ली येथे मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून मोहगाव ते कमरगाव या रस्त्याच्या दर्जोन्नतीच्या कामाच्या भूमीपूजनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा उषा मेंढे होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद उपाध्यक्ष रचना गहाणे, पंचायत समिती सभापती दिलीप चौधरी, जि.प.सदस्य ज्योती वालदे, विश्वजीत डोंगरे, पं.स.सदस्य ललिता बहेकार, अलका काटेवार, माजी पं.स.सभापती डॉ.किशोर गौतम, भाजपा तालुका अध्यक्ष डॉ.लक्ष्मण भगत, सरपंच सुरजलाल पटले, उपसरपंच माया भगत उपस्थित होते.
पुढे बोलताना नामदार बडोले यांनी, कलपाथरी प्रकल्प बाधित आठ गावांना वाढीव मदत देण्यात येईल. कलपाथरी प्रकल्पाचे पाणी जास्तीत जास्त शेतकऱ्यांना मिळाले पाहिजे यासाठी संबंधित विभागाने नियोजन करावे. त्यामुळे शेतकऱ्यांना दुबार व तिबार पिके घेता येईल. या परिसरातील ज्या गावांत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही अशा गावांसाठी पाणीपुरवठा योजना सुरु करण्यात येईल. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी आवश्यक त्या मार्गावर बस फेऱ्या वाढविण्यात येईल. पलखेडा ते निंबा दरम्यान बससेवा सुरु करण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे सांगीतले.
यावर्षी जिल्ह्यातील दलित वस्त्यांच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी देण्यात येईल. २५१५ या लेखा शिर्षातून रस्त्यांच्या कामासाठी निधी देण्यात येईल. मोहगाव येथील शाळेला दोन वर्गखोल्या बांधून देण्यात येईल. जास्तीत जास्त बेरोजगार युवक-युवतींना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी त्यांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देवून स्वावलंबी करण्यात येईल असे सांगितले. जि.प.अध्यक्ष मेंढे यांनी, लोकप्रतिनिधी जागरु क असले की, विकासाला गती मिळते हे पालकमंत्री बडोले यांनी या जिल्ह्याचे पालकत्व स्विकारुन विविध विकास कामांची सुरु वात करु न दाखवून दिले आहे. या परिसरातील ज्या गावांच्या समस्या आहेत त्यांची सोडवणूक करण्यात येईल. जिल्ह्यातील ग्रामीण भागात रस्त्यांची कामे मोठ्या प्रमाणात सुरु असल्याचे सांगितले.
गहाणे यांनी, गोंदिया जिल्हा मागास म्हणून ओळखला जातो. जिल्ह्याचे मागासलेपण दूर करण्याचे काम पालकमंत्री करीत आहे. पालकमंत्र्यांनी जिल्ह्याच्या शाश्वत विकासाला गती दिली आहे. त्यांच्या विकास कामांना सर्वांनी सहकार्य करावे असेही आवाहन केले. दरम्यान पालकमंत्र्यांच्या हस्ते जि.प. केंद्रीय वरिष्ठ प्राथमिक शाळेतील तुलसी कटरे व दीक्षा बहेकार यांना विद्यार्थीरत्न व पुर्णिमा रहांगडाले या विद्यार्थिनीला मोहगाव आयडॉल म्हणून सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र व पुष्पगुच्छ देवून सन्मानीत करण्यात आले. कार्यक्रमाला ग्रामस्थांची मोठ्या संख्येत उपस्थिती होती. प्रास्ताविक बाबुलाल गौतम यांनी मांडले. संचालन शिक्षक अशोक चेटपे यांनी केले. आभार कार्यकारी अभियंता नंदनवार यांनी मानले. (शहर प्रतिनिधी)
सिमेंट रस्ता व
चावडीचे भूमिपूजन
तालुक्यातील पठाणटोला येथे पालकमंत्री बडोले यांच्या हस्ते सिमेंट रस्त्याच्या बांधकामाचे तसेच कन्हारटोली व पालेवाडा येथे चावडी बांधकामाचे भूमीपूजन करण्यात आले. यावेळी जि.प.उपाध्यक्ष रचना गहाणे, पं.स.सभापती दिलीप चौधरी, जि.प.सदस्य विश्वजीत डोंगरे, उपविभागीय अधिकारी सिध्दार्थ भंडारे, तहसिलदार कल्याणकुमार डहाट, पोलीस निरिक्षक सुरेश कदम, शाखा अभियंता श्री.तिराले, सरपंच सोनम जगनीक, उपसरपंच भूषण कटरे यांची यावेळी उपस्थिती होती. हा सिमेंट रस्ता २२२ मीटरचा असून या बांधकामावर १२ लक्ष रु पये खर्च येणार आहे.