गटशिक्षणाधिकाऱ्यांपुढे मांडल्या सेवानिवृत्त शिक्षकांच्या समस्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:27 IST2021-03-19T04:27:33+5:302021-03-19T04:27:33+5:30
गोरेगाव : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने वरिष्ठ व सेवानिवृत्त शिक्षकांच्या मागण्यांसाठी पुढाकार घेत गटशिक्षणाधिकारी एन.जे. सिरसाठे ...

गटशिक्षणाधिकाऱ्यांपुढे मांडल्या सेवानिवृत्त शिक्षकांच्या समस्या
गोरेगाव : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने वरिष्ठ व सेवानिवृत्त शिक्षकांच्या मागण्यांसाठी पुढाकार घेत गटशिक्षणाधिकारी एन.जे. सिरसाठे यांची भेट घेऊन बुधवारी चर्चा करण्यात आली.
चर्चेत, सातव्या वेतन आयोगाच्या पहिल्या हप्त्याची रक्कम रोखीने मिळावी, सेवानिवृत्त शिक्षकांना ३ टक्के महागाई भत्त्याची थकबाकी मिळावी, बी.के. कटरे यांची नक्सल भत्ता थकबाकी देण्यात यावी, शिक्षकांच्या मागणीनुसार त्यांचे सेवापुस्तक त्यांच्या स्वगावी पाठविण्यात यावे आदी विषय मांडून त्यावर चर्चा करण्यात आली. यावर सिरसाठे यांनी, सातव्या वेतन आयोगाच्या पहिल्या हप्त्याच्या रकमेबाबत डिसेंबर २०१९ ते मार्च २०२१ पर्यंत सेवानिवृत्त होणाऱ्या शिक्षकांच्या सातव्या वेतन आयोगाच्या पहिल्या हप्त्याची रक्कम त्यांना ऑफलाइन काढून रोखीने मिळण्यासाठी तरतूद मागविली आहे. लवकरच वेतनात रोखीने मिळणार असल्याचे सांगितले. तसेच सर्व सेवानिवृत्त शिक्षकांची यादी तयार करून शुक्रवारी महागाई भत्त्याची थकबाकी रक्कम सर्वांना लवकरच प्राप्त होणार. सेवानिवृत्त शिक्षकांना दुय्यम सेवापुस्तक मिळण्याबाबत गटशिक्षाणाधिकाऱ्यांनी सर्व सेवानिवृत्त शिक्षकांना दुय्यम सेवापुस्तक तयार करण्यासाठी सेवापुस्तक उपलब्ध करून देण्याची सूचना केली व सेवापुस्तकावर स्वाक्षरी करण्याची हमी दिली. शिक्षक कटरे यांचे थकबाकी बिल पंचायत समितीच्या कोषागार विभागात पाठविण्यात आले असल्याचे सांगितले. सेवापुस्तकांच्या विषयात सेवानिवृत्त शिक्षकांनी स्वतः आपल्या ज्या पंचायत समितीमध्ये पेन्शन ट्रान्सफर करावयाची आहे त्या खंडविकास अधिकाऱ्यांमार्फत सध्याच्या खंडविकास अधिकाऱ्यांकडे प्रस्ताव पाठवावे, असे सांगितले. याप्रसंगी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ गोरेगावचे अध्यक्ष, सरचिटणीस, संचालक, कार्यकर्ते व सेवानिवृत्त शिक्षक उपस्थित होते.