पुराम यांनी जाणून घेतल्या समस्या

By Admin | Updated: September 25, 2015 02:26 IST2015-09-25T02:26:37+5:302015-09-25T02:26:37+5:30

आमगाव-देवरी विधानसभा क्षेत्राचे आ. संजय पुराम यांनी सालेकसा तालुक्यातील काही गावांचा जनसंपर्क दौरा करून प्रत्यक्ष जनतेच्या समस्या जाणून घेतल्या.

Problems Learned by Pooram | पुराम यांनी जाणून घेतल्या समस्या

पुराम यांनी जाणून घेतल्या समस्या

सालेकसा : आमगाव-देवरी विधानसभा क्षेत्राचे आ. संजय पुराम यांनी सालेकसा तालुक्यातील काही गावांचा जनसंपर्क दौरा करून प्रत्यक्ष जनतेच्या समस्या जाणून घेतल्या.
एक दिवसीय दौऱ्यात विचारपूर, टोयागोंदी, दल्लाटोला, डघराटोला, दरेकसा, कहाली, पिपरीया या गावांमध्ये भेट देऊन गावातील सर्वसामान्य लोकांशी संवाद साधला. यावेळी लोकांनी आपल्या अनेक समस्यांचे निराकरण करण्याची विनंती केली.
यात श्रावणबाळ योजनेचा लाभ, घरकुल योजनेचा लाभ, गावातील रस्ते याबाबत लोकांनी मनमोकळेपणाने समस्या सांगितल्या. या समस्या आ. पुराम यांनी दूर करण्याचे आश्वासन दिले. याबद्दल काही अधिकाऱ्यांना त्याचवेळी फोनवर संपर्क करुन निर्देश दिले. आदिवासी भागातील अपूर्ण प्रकल्प बेवारटोला, कुआढास प्रकल्प पूर्ण करण्याचे निवेदन त्यांना देण्यात आले. जनसंपर्क दौऱ्यात आ. संजय पुराम यांच्यासोबत भाजपचे ज्येष्ठ नेते राकेश शर्मा, तालुकाध्यक्ष खेमराज लिल्हारे, जिल्हा उपाध्यक्ष शंकर मडावी तालुका महामंत्री राजेंद्र बडोले, उमेदवार जैतवार, परसराम फुंडे व इतर पदाधिकारी सहभागी झाले. (प्रतिनिधी)

Web Title: Problems Learned by Pooram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.