धानाची उचल व धानखरेदीची समस्या मार्गी लागणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:30 IST2021-05-07T04:30:34+5:302021-05-07T04:30:34+5:30

सडक-अर्जुनी : खरीप हंगामातील धानाची उचल करून भरडाईसाठी पाठविले व रब्बी हंगामातील निघालेल्या धानाची खरेदी त्वरित केंद्रावर करण्यात यावी, ...

The problem of lifting and purchase of paddy will be solved | धानाची उचल व धानखरेदीची समस्या मार्गी लागणार

धानाची उचल व धानखरेदीची समस्या मार्गी लागणार

सडक-अर्जुनी : खरीप हंगामातील धानाची उचल करून भरडाईसाठी पाठविले व रब्बी हंगामातील निघालेल्या धानाची खरेदी त्वरित केंद्रावर करण्यात यावी, यासाठी आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी बुधवारी विभागीय आयुक्त संजीव कुमार यांची भेट घेऊन शेतकऱ्यांच्या समस्यांसंदर्भात चर्चा केली. त्यामुळे धानाची उचल व रब्बी हंगामातील धानखरेदीची समस्या येत्या चार ते पाच दिवसांत मार्गी लागणार असल्याचे आश्वासन आयुक्तांनी दिले.

यावेळी खरीप हंगामातील खरेदी केलेल्या धानाची भरडाई करण्यासाठी उचल करणे, रब्बीसाठी धानखरेदी केंद्र सुरू करणे, गोदाम उपलब्ध करून देणे, यासंदर्भात चर्चा केली. चर्चेच्यावेळी अन्न व नागरी पुरवठा विभागाचे उपायुक्त आडे उपस्थित होते. त्यांनी येत्या चार ते पाच दिवसांत धानाची उचल व भरडाई सुरू होणार असल्याचे सांगितले. याशिवाय, संबंधित विभागाचे सचिव हे स्वत: ७ मे दरम्यान गोंदिया व भंडारा जिल्ह्यात भेट देणार असून संबंधितांशी चर्चा करून तोडगा काढणार आहेत. त्यामुळे येत्या चार ते पाच दिवसांत अडचणी दूर होतील.

Web Title: The problem of lifting and purchase of paddy will be solved