उत्कृष्ट कामे करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना बक्षीस

By Admin | Updated: November 12, 2014 22:47 IST2014-11-12T22:47:16+5:302014-11-12T22:47:16+5:30

सालेकसा तालुक्यातील आरोग्य विभागातील कर्मचारी व आशा कार्यकर्ती जे सर्वोत्कृष्ट काम एप्रिल २०१४ ते ३१ मार्च २०१५ या आर्थिक वर्षात करतील अशा कर्मचाऱ्यांना प्रथम, द्वितीय व तृतीय पुरस्कार,

Prize reward for health workers doing outstanding work | उत्कृष्ट कामे करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना बक्षीस

उत्कृष्ट कामे करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना बक्षीस

सालेकसा : सालेकसा तालुक्यातील आरोग्य विभागातील कर्मचारी व आशा कार्यकर्ती जे सर्वोत्कृष्ट काम एप्रिल २०१४ ते ३१ मार्च २०१५ या आर्थिक वर्षात करतील अशा कर्मचाऱ्यांना प्रथम, द्वितीय व तृतीय पुरस्कार, प्रशस्तीपत्र व स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात येणार आहे, अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.विवेक अनंतवार यांनी दिली.
या तालुक्यातील जी आरोग्य सेविका आपल्या उपकेंद्राच्या ईमारतीत सर्वात जास्त प्रसूती करणार अशा आरोग्य सेवीकेला रोख प्रथम पुरस्कार १५०० रुपये, द्वितीय पुरस्कार १००० रुपये व तृतीय पुरस्कार ७०० रुपये देण्यात येईल. जे आरोग्य कर्मचारी सर्वात जास्त कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया प्रकरणे करण्यास पुढाकार घेतील त्या कर्मचाऱ्यांना प्रथम पुरस्कार १५०० रुपये, द्वितीय पुरस्कार १००० रूपये व तृतीय पुरस्कार ५०० रुपये देण्यात येईल. जी आशा कार्यकर्ती सर्वात जास्त केलेल्या कामाचे मोबदला प्राप्त करेल व सर्वात जास्त आरोग्य संस्थेत प्रसूतीकरिता गरोदर मातांना प्रवृत्त करणार अशा आशा कार्यकर्तीला रोख प्रथम पुरस्कार १५०० रुपये द्वितीय पुरस्कार १००० रुपये व तृतीय पुरस्कार ५०० रुपये देण्यात येईल.
आरोग्य कर्मचाऱ्यांना व आशा कार्यकर्तींना प्रोत्साहन म्हणून पुरस्कार देण्याचे जिल्ह्यात प्रथमच अतिदुर्गम नक्षलग्रस्त आदिवासी भागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांकरिता नियोजन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विवेक अनंतवार यांनी आहे. आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना व आशा कार्यकर्तींनी ३१ मार्च २०१५ पर्यंत आपले उत्कृष्ट कामे करुन प्रथम, द्वितीय व तृतीय पुरस्कार प्राप्त करुन घेण्याची सुवर्ण संधी दिलेली आहे. त्यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांत आनंद आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Prize reward for health workers doing outstanding work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.