मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या समस्या प्राधान्याने सोडविणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:30 IST2021-03-27T04:30:01+5:302021-03-27T04:30:01+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क बोंडगावदेवी : तालुक्यातील कर्मचारी, शिक्षक व अधिकाऱ्यांचे प्रश्न निकाली काढण्याकरिता कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष तथा शिक्षक ...

मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या समस्या प्राधान्याने सोडविणार
लोकमत न्यूज नेटवर्क
बोंडगावदेवी : तालुक्यातील कर्मचारी, शिक्षक व अधिकाऱ्यांचे प्रश्न निकाली काढण्याकरिता कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष तथा शिक्षक संघटनेचे राज्य सरचिटणीस ओमप्रकाश वासनिक यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने गटविकास अधिकारी एस्. टी. तुरकर यांची भेट घेऊन त्यांना बुधवारी (दि. २४) निवेदन दिले.
बालविकास प्रकल्प अधिकारी आर. जे. चव्हाण, गटशिक्षणाधिकारी एस्. जी. वाघमारे, सहाय्यक प्रशासन अधिकारी जी. एस्. पवार, कनिष्ठ प्रशासन अधिकारी एम. आर. पटले यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या चर्चेत शिष्टमंडळाने १०, २० व ३० वर्षांच्या नियमित सेवेनंतरची तीन लाखांची सुधारित प्रगती योजना दिनांक १ जानेवारी २०१६पासून लागू करण्यासंदर्भात कार्यवाही करावी, कंत्राटी कर्मचाऱ्यांचे मासिक मानधन वेळेवर करण्यात यावे, शिक्षकांचे वरिष्ठ व निवडश्रेणी प्रस्ताव तसेच जिल्हा परिषद शिक्षकांच्या सेवापुस्तिका सहाव्या व सातव्या वेतन आयोगाच्या मंजुरीसाठी जिल्हा परिषदेला पाठवाव्या, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची अंश राशी त्वरित देण्यात यावी, जिल्हा परिषद कर्मचारी व शिक्षकांचे उच्च परीक्षेला बसण्याचे व परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे कार्योत्तर परवानगी अर्ज व वैद्यकीय प्रतिपूर्ती देयक अविलंब व सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांची सेवानिवृत्ती फाईल त्वरित जिल्हा परिषदेला पाठवावी, अडकून पडलेल्या सेवापुस्तिका संबंधित विभागांना पत्र पाठवून त्वरित मागवाव्या, कर्मचाऱ्यांचे मासिक वेतन दर महिन्याच्या १ तारखेला करावे, कर्मचारी व अंगणवाडी सेविकांचे प्रवास भत्ता देयक नियमित काढावे, या विषयांवर चर्चा करण्यात आली. सर्व समस्या प्राधान्याने निकाली काढण्याचे आश्वासन गटविकास अधिकाऱ्यांनी दिले. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष भरत वाघमारे, शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजय उके, महासंघाचे जिल्हा संघटन सचिव संदीप रामटेके, जिल्हा संघटक विनोद रंगारी, तालुकाध्यक्ष रवींद्र शहारे, शिक्षक संघटनेचे तालुकाध्यक्ष संजय रामटेके, महासंघाचे ए. एस. कोसमे, आर. एन. वगारे, एस. डी. मडावी, भारती वाघमारे, एम. डब्ल्यू. भुरे, डी. डी. मेश्राम, एस्. डी. नागदेवे, ए. जी. सिरसाम, जे. एन. बोरकर, एस्. जी. कन्नाके, पी. व्ही. भांडारकर, एस्. डी. भांडारकर, डी. बी. कटरे, भंडारी आदी उपस्थित होते.