शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

प्राथमिक शिक्षकांना केंद्रप्रमुख पदापासून डावलले; शासनाच्या निर्णयाने शिक्षकांमध्ये रोष

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2025 16:31 IST

Gondia : १८ जुलैचा निर्णय रद्द करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या १८ जुलै २०२५ च्या अधिसूचनेमुळे जिल्हा परिषद शाळांतील अनेक ज्येष्ठ शिक्षक पदोन्नतीपासून वंचित राहणार आहेत. केंद्रप्रमुख या नव्याने तयार केलेल्या पदासाठी प्रशिक्षित पदवीधर शिक्षक प्राथमिक या पदावर किमान सहा वर्ष कार्यरत असणे अनिवार्य केले आहे. मात्र बहुसंख्य बीएड आणि दीर्घ सेवा अनुभव असलेले प्राथमिक शिक्षक केवळ 'पदनाम' नसल्याने अपात्र ठरत आहेत. त्यामुळे हा निर्णय रद्द करण्याची मागणी विविध शिक्षक संघटनाकडून केली जात आहे.

राज्यातील अनेक जि.प. शाळांमध्ये गेल्या २० वर्षापासून बीएडधारक शिक्षक कार्यरत आहेत. मात्र त्यांची नोंद प्राथमिक शिक्षक अशी असल्याने आणि टीजीटी प्रशिक्षित पदवीधर शिक्षक म्हणून बदल झालेला नाही. म्हणून त्यांना केंद्रप्रमुख पदासाठी विचारले जात नाही. नवीन अधिसूचनेत प्रत्यक्षात सेवाज्येष्ठता, गुणवत्ता, अनुभव गौण ठरवून फक्त पदनामाची तांत्रिक अट लादली जात असल्याचा आरोप शिक्षक संघटनांनी केला आहे. 

अधिसूचनेतील मूळ अटकेंद्रप्रमुख पदासाठी प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (प्राथमिक) या पदावर सहा वर्षे कार्यरत असलेल्यांना पात्रता आहे. यामुळे दीर्घ सेवा व आवश्यक शैक्षणिक अर्हता असूनही केवळ पदनाम नसल्याने हजारो शिक्षकांचा न्याय्य हक्कापासून डावलले जात असल्याने शिक्षकांत असंतोष आहे.

सेवाज्येष्ठ शिक्षकांना संधी देण्याची मागणीशिक्षकांच्या अनुभवाचा, गुणवत्ता आणि सेवा वर्षांचा योग्य सन्मान न करता फक्त पदनामावर केंद्रप्रमुखपदासाठी निवड होणं अन्यायकारक आहे. त्यामुळे शासनाने अधिसूचनेतील अटी शिथिल करून सर्व पात्र, सेवाज्येष्ठ शिक्षकांना न्याय्य संधी देण्यात यावी.

पदोन्नतीपासून वंचित ठेवणे हा अन्याय

  • विविध शिक्षक संघटनांनी या अटीला आक्षेप घेत उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा विचार सुरू केला आहे.
  • सर्वत्र प्रबळ मागणी बीएड आणि सेवाज्येष्ठता असलेल्या शिक्षकांना देखील संधी द्यावी, केवळ पदनामावर आधारित अन्याय थांबवा. २२ वर्षे सेवा, बीएड असूनही १ ते ५ वी शिकवतो आणि टीजीटी म्हणून निरीक्षण नाही म्हणून मला पदोन्नतीपासून वंचित ठेवणे हा अन्याय असल्याचा आरोप शिक्षकांनी केला आहे.
टॅग्स :gondiya-acगोंदियाEducationशिक्षण