तिसऱ्या लाटेसाठी गावपातळीपर्यंत यंत्रणा सज्ज ठेवा ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:34 IST2021-09-14T04:34:33+5:302021-09-14T04:34:33+5:30

गोंदिया : कोविड १९ हा आजार संपलेला नाही. जिल्ह्यात जरी कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी असली तरी कोरोनावर मात करण्यासाठी ...

Prepare the system for the third wave up to the village level () | तिसऱ्या लाटेसाठी गावपातळीपर्यंत यंत्रणा सज्ज ठेवा ()

तिसऱ्या लाटेसाठी गावपातळीपर्यंत यंत्रणा सज्ज ठेवा ()

गोंदिया : कोविड १९ हा आजार संपलेला नाही. जिल्ह्यात जरी कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी असली तरी कोरोनावर मात करण्यासाठी कोविड-१९ नियमावलीचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे. म्हणून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संभाव्य तिसऱ्या लाटेसाठी गावपातळीपर्यंत आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी नयना गुंडे यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात सोमवारी (दि. १३) कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनेबाबत आढावा घेण्यात आला. यावेळी त्या बोलत होत्या. सहायक जिल्हाधिकारी अनमोल सागर, निवासी उपजिल्हाधिकारी जयराम देशपांडे, उपजिल्हाधिकारी सुभाष चौधरी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. विनायक रुखमोडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अमरीश मोहबे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन कापसे उपस्थित होते. सद्य:स्थितीत जिल्ह्यात सण उत्सव सुरू असल्यामुळे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शंका नाकारता येत नाही. दुसरीकडे बाजारपेठ पूर्णपणे सुरू करण्यात आले आहे. या दरम्यान, कोविड-१९ चे काही निर्बंधदेखील शिथिल करण्यात आले आहे. अशा परिस्थितीत कोविडचा संसर्ग वाढण्याचा धोका निर्माण झालेला आहे. त्यामुळे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी प्रशासन व वैद्यकीय यंत्रणा सज्ज करण्यात येत आहे.

........

ऑक्सिजन खाटांची संख्या वाढविणार

तालुक्यातील आरोग्य केंद्रातील उपलब्ध खाटांना ऑक्सिजनशी जोडणी करण्यात येणार आहे. औषधसाठा, प्राणवायू उपलब्ध ठेवणे, टेस्टिंग वाढविणे, व्हॅक्सिनेशन वाढविणे व मृत्युदर कमी करणे या बाबींना प्राधान्य देऊन नियोजन करावे असे निर्देश जिल्हाधिकारी

नयना गुंडे यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले.

...........

त्रिसूत्रीचे करा पालन

कोरोनाचे संकट अद्याप टळलेले नाही. त्यामुळे मास्क वापरणे, सुरक्षित अंतर ठेवणे व हात वारंवार स्वच्छ करणे या त्रिसूत्रीमुळेच कोरोनावर मात करणे शक्य आहे. कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेसाठी जिल्हा प्रशासनाने विविध उपाययोजना आखल्या असून, त्यासाठी जिल्ह्यातील नागरिकांनी कोविड नियमावलीचे काटेकोरपणे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे जिल्हाधिकारी गुंडे यांनी सांगितले.

Web Title: Prepare the system for the third wave up to the village level ()

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.