जिल्ह्यात वृक्षारोपणासाठी १.३५ लाख खड्डे तयार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2016 01:32 IST2016-06-22T01:32:36+5:302016-06-22T01:32:36+5:30

शासनाने १ जुलै रोजी दोन कोटी वृक्ष लागवड करण्याचा मानस बांधला. त्यानुसार या वृक्ष लागवडीच्या कामात ग्राम पंचायतपासून सर्वच शासकीय विभाग सहभागी होणार आहेत.

Prepare 1.35 lakh potholes for tree plantation in the district | जिल्ह्यात वृक्षारोपणासाठी १.३५ लाख खड्डे तयार

जिल्ह्यात वृक्षारोपणासाठी १.३५ लाख खड्डे तयार

१ जुलैचा मुहूर्त : १.७० हजार झाडे लावणार
गोंदिया : शासनाने १ जुलै रोजी दोन कोटी वृक्ष लागवड करण्याचा मानस बांधला. त्यानुसार या वृक्ष लागवडीच्या कामात ग्राम पंचायतपासून सर्वच शासकीय विभाग सहभागी होणार आहेत. त्यासाठी जिल्ह्यात १ लाख ३५ हजार खड्डे तयार झाले असून या उपक्रमात नागरिकांना सहभागी करून घेण्यासाठी मंगळवार दि.२१ रोजी प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये ग्रामसभा घेण्यात आली.
एकाच दिवशी जिल्ह्यात एक लाख ६९ हजार ७९३ रोपटे लावण्यात येणार आहेत. ५५१ ग्राम पंचायतच्या माध्यमातून ५५ हजार १०० रूपटे लावण्याचे उद्दीष्टे ठरविण्यात आले आहे. त्यासाठी ग्राम पंचायतींनी आतापर्यंत ६२ हजार ३३५ खड्डे खोदले आहेत. आमगाव तालुक्यात ६३ ग्राम पंचायतींना ६३०० रोपटे लावण्याचे उद्दीष्ट्य आहे. या तालुक्यात ६ हजार ३५४ खड्डे खोदण्यात आले आहेत. अर्जुनी-मोरगाव तालुक्यात ७० ग्राम पंचायतींना ७ हजार रोपटे लावण्याचे उद्दीष्ट्य आहे. या तालुक्यात ११ हजार १२१ खड्डे खोदण्यात आले आहेत. देवरी तालुक्यात ५५ ग्राम पंचायतींना ५५०० रोपटे, गोंदिया तालुक्यात १०९ ग्राम पंचायतींना १० हजार ९०० रोपटे, गोरेगाव तालुक्यात ५५ ग्राम पंचायतींना ५५०० रोपटे लावण्याचे उद्दीष्ट्य आहे. सालेकसा तालुक्यात ४२ ग्राम पंचायतींना ४२०० रोपटे लावण्याचे उद्दिष्ट्य आहे.

इतर विभाग १ लाख १४ हजार रोपटे लावणार
वृक्षारोपणासाठी प्राथमिक शिक्षण विभागाला ५० हजार रोपटे लावण्याचे उद्दीष्टे आहेत. त्यासाठी २५ हजार ४४ खड्डे खोदण्यात आले आहेत. माध्यमिक शिक्षण विभागाला ५० हजार रोपटे लावण्याचे उद्दीष्टे आहेत. त्यासाठी ३५ हजार खड्डे, महिला बालकल्याण विभागाला ३३५८ रोपट्यांसाठी ३३५८ खड्डे, सार्वजनिक बांधकाम विभागाला ३८०० रोपट्यांसाठी ९४० खड्डे खोदण्यात आले आहेत. पशुसंवर्धन विभागाला १०३० रोपट्यांचे उद्दीष्ट असून १०३० खड्डे खोदले, आरोग्य विभागाला २०२५ रोपट्यांचे उद्दीष्ट असताना २२४० खड्डे खोदण्यात आले आहेत.

Web Title: Prepare 1.35 lakh potholes for tree plantation in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.