दिवाळीच्या सुट्यांत वनभ्रमणाला पसंती
By Admin | Updated: October 25, 2014 22:41 IST2014-10-25T22:41:17+5:302014-10-25T22:41:17+5:30
नवेगावबांध राष्ट्रीय उद्यान, कोका अभयारण्य तसेच नागझिरा व न्यू नागझिरा अभयारण्य मिळून व्याघ्र प्रकल्पाला मान्यता मिळाली आहे. त्यामुळे वनपर्यटकांचे आकर्षण वाढले असून दिवाळी सुट्यांमध्ये

दिवाळीच्या सुट्यांत वनभ्रमणाला पसंती
नवेगाव-नागझिरा सज्ज : सर्व प्रवेशव्दारांवर वाहनांची व्यवस्था
गोंदिया : नवेगावबांध राष्ट्रीय उद्यान, कोका अभयारण्य तसेच नागझिरा व न्यू नागझिरा अभयारण्य मिळून व्याघ्र प्रकल्पाला मान्यता मिळाली आहे. त्यामुळे वनपर्यटकांचे आकर्षण वाढले असून दिवाळी सुट्यांमध्ये वनभ्रमंती करण्यासाठी आॅनलाईन बुकिंग जोरात सुरू आहे.
१ आॅक्टोबरपासून पर्यटकांसाठी येथील सर्व प्रवेशद्वार उघडे करण्यात आले आहे. वनपर्यटकांना पुरेशा सोयी सुविधा देण्यासाठी प्रशासनही वनविभागही सज्ज आहे. नवेगावबांध राष्ट्रीय उद्यानाचे जांभळी, खोली, बकी व पितांबरटोला अशी चार प्रवेशद्वार उघडी करण्यात आली आहेत. आॅनलाईन वाहनांच्या बुकींगसाठी जांभळी गेटवर दुपारपूर्वी तीन व दुपारनंतर तीन, खोली येथे दुपारपूर्वी व दुपारनंतर प्रत्येकी तीन, बकी गेटवर दुपारपूर्वी व दुपारनंतर प्रत्येकी तीन, पितांबरटोला गेटवर दुपारपूर्वी पाच व दुपारनंतर सहा वाहनांची सोय करण्यात आली आहे. कोका अभयारण्याच्या चंद्रपूरटोला गेटवर आॅनलाईनसाठी दुपारपूर्वी व दुपारनंतर प्रत्येकी चार वाहन तसेच आॅफलाईनसाठी दुपारपूर्वी व दुपारनंतर प्रत्येकी एकेक वाहनांची सोय करण्यात आली आहे.
नागझिरा व न्यू नागझिरा वन्यजीव अभयारण्यातील पाचही गेट उघडी करण्यात आली आहेत. पिटेझरी येथे आॅनलाईनसाठी २१, आॅफलाईनसाठी सहा, चोरखमारा गेट-१ वर आॅनलाईनसाठी ११ व आॅफलाईनसाठी दोन, मंगेझरी गेटवर आॅनलाईनसाठी सहा व आॅफलाईनसाठी दोन, उमरझरी गेटवर आॅनलाईनसाठी १३ व आॅफलाईनसाठी चार, चोरखमारा गेट-२ वर आॅनलाईनसाठी १० व आॅफलाईनसाठी दोन, तसेच नागझिरा संकूल एफडीसीएममध्ये आॅनलाईनसाठी दुपारपूर्वी व दुपारनंतर प्रत्येकी सहा वाहनांची सोय करण्यात आली आहे.
नवेगावबांध राष्ट्रीय उद्यानाच्या जांभळी, खोली, बकी व पितांबरटोला या चारही व कोका अभयारण्याच्या चंद्रपूर गेटवरून वयस्क भारतीयांसाठी प्रत्येकी ३० रूपये तसेच ५ ते १८ वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी प्रत्येकी १५ रूपये प्रवेश शुल्क ठेवण्यात आले आहे. तसेच विदेशी पर्यटकांसाठी प्रत्येकी ६० रूपये व ५ ते १८ वयोगटातील विदेशी विद्यार्थ्यांसाठी प्रत्येकी ३० रूपये प्रवेशशुल्क आहे. नागझिरा व न्यू नागझिरा अभयारण्याच्या पिटेझरी, चोरखमारा गेट-१, मंगेझरी, उमरझरी व चोरखमारा गेट-२ या चारही ठिकाणातून प्रवेशासाठी वयस्क भारतीयांना प्रत्येकी ५० रूपये व ५ ते १८ वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी प्रत्येकी २५ रूपये प्रवेश शुल्क आकारण्यात येत आहे. तसेच विदेशी वयस्क पर्यटकांकडून प्रत्येकी १०० रूपये व ५ ते १८ वयोगटातील विदेशी विद्यार्थ्यांकडून प्रत्येकी ५० रूपये प्रवेश शुल्क आकारले जात आहे. पिटेझरी गेटवर २० सिटर सफारी, चोरखमारा गेटवर आठ सिटर सफारी व नवेगावबांध गेटवर ३० सिटर सफारी गाड्यांची सोय करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)