धापेवाड्यातून पिण्याच्या पाण्याला प्राधान्य

By Admin | Updated: May 4, 2016 02:54 IST2016-05-04T02:54:59+5:302016-05-04T02:54:59+5:30

धापेवाडा उपसा सिंचन योजनेतून ज्या गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होतो त्या गावातील नागरीकांना या योजनेतून

Preferred drinking water from the burns | धापेवाड्यातून पिण्याच्या पाण्याला प्राधान्य

धापेवाड्यातून पिण्याच्या पाण्याला प्राधान्य

पालकमंत्री बडोले : अधिकाऱ्यांच्या बैठकीत निर्देश
गोंदिया : धापेवाडा उपसा सिंचन योजनेतून ज्या गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होतो त्या गावातील नागरीकांना या योजनेतून पिण्याच्या पाण्याचा नियमित पुरवठा करावा. या योजनेतून उद्योगाला पाणी देण्यापेक्षा पिण्याच्या पाण्याला संबंधित विभागाने प्राधान्य द्यावे, असे मत पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी व्यक्त केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात या संबंधाने आयोजित बैठकीत पालकमंत्री बडोले बोलत होते. यावेळी आ.विजय रहांगडाले, जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी, अपर जिल्हाधिकारी मंगेश मोहिते, धापेवाडा उपसा सिंचन योजनेचे कार्यकारी अभियंता यासतवार, तिरोडाचे उपविभागीय अधिकारी प्रवीण मिहरे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
पालकमंत्री यावेळी म्हणाले, जिल्हाधिकारी व धापेवाडा उपसा सिंचन योजनेच्या अधिकाऱ्यांनी या विषयावर एकत्र बसून पाणी सोडण्याबाबतचे नियोजन करावे. या योजनेवर ज्या गावांचा पाणीपुरवठा आहे त्या गावांना पाणीपुरवठा नियमित झाला पाहिजे.
उन्हाळ्याच्या दिवसात धापेवाडा प्रकल्पात पिण्याचे पाणी असताना संबंधित गावातील महिलांना पाण्यासाठी इतरत्र भटकंती करण्याची वेळ येणार नाही, याकडे संबंधित विभागाने लक्ष दयावे अशा सूचना पालकमंत्र्यांनी केल्या.
धापेवाडा उपसा सिंचन योजनेतून अदानी प्रकल्पासाठी पाणी चोरी होत असल्याच्या तक्रारी आल्याचे आमदार विजय रहांगडाले यावेळी म्हणाले. धापेवाडात शिल्लक असलेला पाणीसाठा लक्षात घेऊन पिण्याच्या पाण्यासाठीच हे पाणी उपलब्ध करुन द्यावे, असेही त्यांनी सांगितले. कार्यकारी अभियंता यासटवार यांनी धापेवाडा प्रकल्पात केवळ २ टक्के पिण्याचे पाणी आहे. त्यामुळे यापुढे उन्हाळ्याच्या दिवसात अदानी प्रकल्पाला पाणी पुरवठा करण्यात येणार नसून २७ एप्रिल रोजीच अदानी प्रकल्पाचा पाणीपुरवठा बंद केल्याचे त्यांनी सांगितले. (जिल्हा प्रतिनिधी)

- तर उद्भवणार राज्यात वीज संकट
४अदानी वीज प्रकल्पाला पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे. पण धापेवाडात जलसंकट निर्माण झाल्यामुळे बावनथडी प्रकल्पातील पाणी धापेवाडा प्रकल्पासाठी सोडण्यासाठी वीजमंत्र्यांसह राज्य सरकारमधील वरिष्ठ लोक प्रयत्नशील असल्याचे कळते. मात्र हे पाणी धापेवाड्यात पोहोचण्यासाठी काही दिवस लागतात. त्यामुळे तातडीने सरकारने पावले उचलली नाही तर अदानी प्रकल्पाला पाणी उपलब्ध होईपर्यंत दोन युनिट बंद ठेवावे लागतील. त्यामुळे राज्यात १२०० मेगावॅट वीजेचा तुटवडा निर्माण होऊन सर्वत्र भारनियमन सुरू होणार आहे. आधीच उन्हाळ्यामुळे वीजेची मागणी वाढली असताना हे संभाव्य वीजसंकट नागरिकांसाठी त्रासदायक ठरणार आहे.

धापेवाडाच्या अधिकाऱ्यांचे दुटप्पी धोरण?
४दरम्यान धापेवाडा प्रकल्पाच्या कार्यकारी अभियंत्यांनी एकीकडे पाणी घेणे थांबविण्यासंदर्भातील अदानी व्यवस्थापनाला पत्र दिल्याचे सांगितले तर दुसरीकडे पाणी देणे सुरूच ठेवले, अशा आशयाची तक्रार जिल्हा परिषद सदस्य मनोज डोंगरे यांनी करून यासाठी प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता यासटवार हेच जबाबदार असल्याचा ठपका त्यांनी ठेवला. यासंदर्भात कार्य.अभियंता यासटवार यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी या विषयावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

Web Title: Preferred drinking water from the burns

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.