वणव्यात बहुमूल्य वनसंपत्ती जळून खाक

By Admin | Updated: April 27, 2015 00:34 IST2015-04-27T00:34:27+5:302015-04-27T00:34:27+5:30

तालुक्यातील पोवारीटोला (कोटजंभुरा) येथील जंगलात दोन दिवसांपूर्वी आग लागून यात मोठ्या प्रमाणात लाकूड व वनौषधी जळून खाल झाली.

The precious forest in the forest burns | वणव्यात बहुमूल्य वनसंपत्ती जळून खाक

वणव्यात बहुमूल्य वनसंपत्ती जळून खाक

पोवारीटोली जंगल : गावकऱ्यांनी मिळविले आगीवर नियंत्रण
सालेकसा : तालुक्यातील पोवारीटोला (कोटजंभुरा) येथील जंगलात दोन दिवसांपूर्वी आग लागून यात मोठ्या प्रमाणात लाकूड व वनौषधी जळून खाल झाली. याकडे वनविभागाचे दुर्लक्ष दिसून आले मात्र गावकऱ्यांनी पुढाकार घेऊन आगीवर नियंत्रण मिळविले.
पोवारीटोला परिसरात पूर्वी वाघनदीच्या काठालगत क्षेत्रात विविध प्रजातीच्या झाडांसह सागवान व निलगिरीचे जंगल पसरले आहे. या जंगलात विविध औषधोपयोगी झाडेही आहेत. परंतु या जंगलाची व्यवस्थीत देखरेख होत नसून वृक्षतोड व लाकूड चोरीचे प्रकार नेहमी घडत असतात. तसेच या क्षेत्रात वणवा लागण्याची नेहमी दाट शक्यात असते.
दोन दिवसांपूर्वी येथे अचानकच आग लागली व त्यामुळे मोठे नुकसान झाले. गावातील युवक मुलचंद नागपुरे, केशव नागपुरे यांच्यासह अन्य युवकांनी जंगलातील आग विझविली. अन्यथा आगीत आणखी मोठे नुकसान झाले असते. असे प्रकार घडू नये व त्यात वनसंपत्ती नष्ट होऊ नये यासाठी वनविभागाने उपाय योजना आखणे गरजेचे आहे. (प्रतिनिधी)

Web Title: The precious forest in the forest burns

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.