काँग्रेसचे प्रफुल अग्रवाल यांचा नामांकन अर्ज दाखल
By Admin | Updated: November 2, 2016 00:23 IST2016-11-02T00:23:39+5:302016-11-02T00:23:39+5:30
भंडारा-गोंदिया विधान परिषद निवडणुकीसाठी काँग्रेसचे उमेदवार प्रफुल गोपालदास अग्रवाल यांनी

काँग्रेसचे प्रफुल अग्रवाल यांचा नामांकन अर्ज दाखल
तिहेरी लढत होणार : भंडारा-गोंदिया विधान परिषद निवडणूक
भंडारा : भंडारा-गोंदिया विधान परिषद निवडणुकीसाठी काँग्रेसचे उमेदवार प्रफुल गोपालदास अग्रवाल यांनी मंगळवारी (
दि.१) दुपारी १२ वाजता जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत चौधरी यांच्याकडे नामांकन अर्ज दाखल केला.
यावेळी विधानसभेचे काँग्रेसचे उपनेता आमदार विजय वडेट्टीवार, माजी मंत्री सतीश चतुर्वेदी, डॉ.नितीन राऊत, बंडुभाऊ सावरबांधे, भरत बहेकार, आ.गोपालदास अग्रवाल, आ.सुनिल केदार, माजी आमदार सेवक वाघाये, अॅड.आनंदराव वंजारी, रामरतन राऊत, गोंदिया जिल्हा परिषद अध्यक्ष उषा मेंढे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अॅड.के.आर. शेंडे, चंद्रशेखर ठवरे, रजनी नागपुरे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणविर, गोंदियाचे जिल्हाध्यक्ष पुरूषोत्तम कटरे, प्रदेश महासचिव जिया पटेल, प्रमोद तितिरमारे, प्रदेश सचिव मुजिब पठाण, प्रफुल गुडधे पाटील, डॉ.योगेंद्र भगत, विनोद जैन, माजी नगराध्यक्ष बशीर पटेल, मधुकर लिचडे, सिमा भुरे, अरविंद कारेमोरे, अमरनाथ रगडे, शिला इटानकर, दीपक नशिने, लाखनीच्या नगराध्यक्ष कल्पना भिवगडे उपस्थित होते.
नामांकन दाखल केल्यानंतर काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत साई मंगल कार्यालयात सभा आयोजित करण्यात आली. यावेळी काँग्रेसचे विधानसभेतील उपनेता आमदार वडेट्टीवार यांनी, विधान परिषदेची ही निवडणूक काँग्रेसची ताकद दाखविण्यासाठी सोनेरी संधी आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने काँग्रेसला नेहमी धोका दिला आहे. एका ठिकाणी राहून शत्रुसारखा व्यवहार केला. त्यामुळे हिशोब चुकता करण्याची वेळ आली असल्याचे म्हटले.
माजी मंत्री डॉ. राऊत यांनी, या निवडणुकीत जातीचे कार्ड खेळण्यात येत आहे. त्याचे उत्तर हिंमतीने दिले जावू शकते. माजी मंत्री सतिश चतुर्वेदी म्हणाले, भंडारा-गोंदिया विधान परिषदेची ही जागा नेहमी काँग्रेसची राहिली आहे. आता ही जागा परत आपल्याकडे येत आहे. २००४ मध्ये ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे कशी गेली, हे आजही समजण्यापलिकडे आहे. आ.अग्रवाल म्हणाले, ही निवडणूक भंडारा-ंगोंदिया जिल्ह्यातील राजकारणाची दिशा बदलविणारी राहणार असून या निवडणुकीत सर्वांच्या एकजुटीची आवश्यकता आहे. आ.सुनिल केदार म्हणाले, प्रफुल अग्रवाल यांचा विजय सुनिश्चित आहे. दोन्ही जिल्ह्यातील काँग्रेसचे नेते मेहनत घेत असल्यामुळे त्याचे चांगले परिणाम लवकरच दिसतील. माजी आमदार सेवक वाघाये म्हणाले, भंडारा-गोंदिया जिल्ह्यात काँग्रेस हा पक्ष एक असल्याचे या निवडणुकीतून दिसून येईल. प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष गणविर यांनी मांडले. संचालन महासचिव पी.जी. कटरे व अपूर्व अग्रवाल यांनी केले. आभार प्रफुल अग्रवाल यांनी मानले.
यावेळी डॉ. झामसिंग बघेले, राजेश नंदागवळी, राधेलाल पटले, जहिर अहमद, पृथ्वीपाल सिंग गुलाटी, डॉ.नामदेव किरसान यांच्यासह मोठ्या संख्येत कॉंग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.