दिवाळीत गायगोधनावर पाळीव पशू खेळवण्याची प्रथा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2017 16:21 IST2017-10-20T16:18:49+5:302017-10-20T16:21:26+5:30
दिवाळीनिमित्त देशाच्या विविध भागात विविध प्रकारच्या पूजा, प्रथा पार पाडल्या जातात. ज्या त्या त्या प्रदेशात अत्यंत महत्त्वाच्या व पारंपारिक रीतीरिवाजांच्या स्थानी असतात.

दिवाळीत गायगोधनावर पाळीव पशू खेळवण्याची प्रथा
आॅनलाईन लोकमत
लालसिंग चंदेल
गोधन म्हणजे गायीचे शेण व त्यात झाडपाला टाकून तयार केलेली गादी वा छोटासा ढीग असतो. या ढिगावर गावातील पशूंनी लोळवले जाते, खेळवले जाते. तसे करण्याने त्यांची प्रकृती उत्तम राहते असा विश्वास या आदिवासी बांधवांना वाटतो. याचबरोबर गावातील नवजात बाळांनाही या गोधनावर थोड्या वेळासाठी ठेवले जाते. त्यांच्याही वाढीसाठी निकोप असे हे गोधन असल्याचा दावा येथील आदिवासी मंडळी करतात. गोंदिया जिल्ह्यातल्या पांढरी गावात ही गोधनाची प्रथा गावकºयांनी शुक्रवारी सकाळी विधीवत पार पाडली.