शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

खासगी युवकांकडून वीज कामे

By admin | Updated: November 10, 2014 22:45 IST

विद्युत खांबावर चढणे, तारांना छेडने, आकडा जोडणे आदी प्रकरणे विद्युत वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना गंभीर गुन्हे वाटतात. मात्र त्याच अधिकाऱ्यांकडून खासगी युवकांकडून विद्युत कामे करवून घेतली जात आहे.

काचेवानी : विद्युत खांबावर चढणे, तारांना छेडने, आकडा जोडणे आदी प्रकरणे विद्युत वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना गंभीर गुन्हे वाटतात. मात्र त्याच अधिकाऱ्यांकडून खासगी युवकांकडून विद्युत कामे करवून घेतली जात आहे. असेच एक प्रकरण विद्युत वितरण कंपनी गंगाझरी शाखेंतर्गत घडले. एक युवक विद्युत कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत खांबावर चढला व खाली आदळून गंभीर जखमी झाला. शुद्ध हरवलेल्या त्या युवकाला एकोडी प्राथमिक आरोग्य केंद्रातून गोंदियाला हलविण्यात आले. मात्र या प्रकरणाची तक्रार पोलिसांत देण्यात आली नाही.खांबावरून पडलेल्या या जखमी युवकाची कनिष्ठ अभियंता अमित चवरे यांनी दखल घेवून पोलिसात तक्रारही केली नाही. या प्रकाराला भ्रष्टाचाराचे गालबोट तर लागले नाही, याबाबत तर्कवितर्क लावला जात आहे. या प्रकरणाची माहिती नसल्याचे ते सांगतात. पण आकडे लावणे, वीज चोरी करणे या बाबींची ते माहिती घेतात. या गंभीर बाबीची माहिती त्यांना नसणे, याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.१६ आॅक्टोबच्या सकाळी १०.३० वाजता कनिष्ठ अभियंता चवरे यांनी कंत्राटी कर्मचारी सुरेश पारधी यांना बरबसपुरा या गावी दुरूस्तीसाठी पाठविले. यावेळी गावातील धर्मराज पुनाजी चौधरी शेतातून येत असताना सदर कर्मचाऱ्याने त्यांना खांबावर (बी-६) चढायला लावले. त्यापूर्वी खांबावरील वीज बंद करण्यात आली नव्हती. चौधरी खांबावर चढले व खाली सिमेंटच्या नालीत आदळले. त्यावेळी विद्युत खांबाचा अर्थिंग तार तुटला. या घटनेत धर्मराज चौधरी यांना तोंडाच्या डाव्या बाजूला गंभीर दुखापत झाली व त्यांची शुद्ध हरपली. त्यांना एकोडीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. यानंतर त्यांना गोंदियाला हलविण्यात आले. या प्रकाराची माहिती होताच काही गावकऱ्यांनी उपचारावेळी सहकार्य केले. कनिष्ठ अभियंता चवरे हेसुद्धा एकोडीत आले व पाहणी केली. मात्र त्यांनी गावकऱ्यांना पोलिसात तक्रार न देण्याची विनंती केली. उपचाराचा खर्च पारधी नामक कर्मचारी भरण्याच्या तयारीत असल्याने गावकरी शांत झाले. ही घटना भर गावातील असून जखमी धर्मराज चौधरी यांनी आपण झाडावरून पडल्याची खोटी माहिती रूग्णालयात सांगितली. त्यांनी ही माहिती सांगितली नाही, अशी चर्चा आहे.