रोहित्रामधून मनोऱ्याला वीज पुरवठा

By Admin | Updated: September 10, 2015 02:11 IST2015-09-10T02:11:02+5:302015-09-10T02:11:02+5:30

भारनियमनातून मुक्ती देण्यासाठी घरगुती वीज ग्राहकांकरिता सिंगल फेज योजना सुरु करण्यात आली.

Power supply to the dam from Rohit | रोहित्रामधून मनोऱ्याला वीज पुरवठा

रोहित्रामधून मनोऱ्याला वीज पुरवठा

नियम बसविले धाब्यावर : वीज वितरण कंपनीचा असाही कारभार
चुल्हाड (सिहोरा) : भारनियमनातून मुक्ती देण्यासाठी घरगुती वीज ग्राहकांकरिता सिंगल फेज योजना सुरु करण्यात आली. परंतु मोहाडी (खापा) गावात गावकऱ्यांचे हक्काचे सिंगल फेज रोहित्रामधून चक्क मोबाईल मनोऱ्याला वीज पुरवठा देण्यात येत असल्याचा प्रकार उघडकीला आला आहे.
परिणामी गावकऱ्यांना अघोषित भारनियमनाचा भार सोसावा लागत आहे. घरगुती वीज ग्राहकांना भारनियमनातून मुक्ती देण्यासाठी सिंगल फेज योजना सिहोरा परिसरातील गावात सुरु करण्यात आली आहे. संपूर्ण गावकऱ्यांना सिंगल फेज रोहित्रामधून वीज पुरवठा करण्यात येत आहे. या शिवाय याच गावात असणाऱ्या शेतकऱ्यांचे कृषी पंपाकरिता स्वतंत्र थ्री फेज रोहित्र लावण्यात आले आहे. शेतकऱ्यांना पंपाकरिता देण्यात येणारा वीज पुरवठा भारनियमनात आाहे. परंतु सिंगल फेज वीज पुरवठा भारनियमन मुक्त आहे.
परंतु मोहाडी (खापा) गावात चित्र उलटे आहे. या गावात अतिरिक्त सिंगल फेज रोहित्र पुरवठा करण्याची मागणी आहे. या गावात वीज ग्राहकांची संख्या अधिक असल्याने पुरेशी वीज नाही. यामुळे वारंवार वीज पुरवठा खंडीत होत आहे. दिवसरात्र कधीही विजेचा लपंडाव सुरु असल्याने गावकरी वैतागले आहे. दरम्यान खासगी कंपनीचे मोबाईल मनोरा गावात कार्यान्वित करण्यात आले आहे. या मनोऱ्याला वीज पुरवठा देताना थ्री फेज रोहित्रची अट आहे. परंतु सिहोरा वीज वितरण कंपनीच्या कार्यालयाचे सिंगल फेज रोहित्र मधून वीज पुरवठा मनोऱ्याला दिला आहे.
मनोऱ्याला वीज पुरवठा सुरु करण्यात आल्याने गावात पुन्हा विजेचा लपंडाव सुरु झाला आहे. मनोऱ्याकरिता थ्री फेज रोहित्र मंजूर करण्यात आहे.
एकाच सिंगल फेज रोहित्रामधून गावकरी आणि मनोऱ्याला वीज पुरवठा होत असल्याचे पहिलेच उदाहरण आहे. या परिसरात अन्य मनोऱ्याला थ्री फेज चे रोहित्र देण्यात आले असून मोहाडी (खापा) गावात नियम धाब्यावर बसविण्यात आले आहे. सिंगल फेज रोहित्र शेतशिवारात असल्याने तांत्रिक अडचणी निर्माण गावकऱ्यांना कसरत करावी लागत आहे. (वार्ताहर)
एकाच रोहित्रामधून दोन गावांना पुरवठा
दावेझरी आणि चुल्हरडोह अशी वेगवेगळी दोन गावे असताना एकाच सिंगल फेज रोहित्रामधून या गावांना वीज पुरवठा करण्यात येत आहे. अतिरिक्त विजेचा दाब वाढत असल्याने या रोहित्राचे वायर जळाले आहेत. यामुळे वारंवार वीज पुरवठा खंडीत होत आहे. या गावाच्या शेजारी वाघांचे अस्तित्व असल्याने भीतीमुळे गावकरी सायंकाळी घराबाहेर पडत नाही. स्वतंत्र रोहित्र मंजूर करण्याची मागणी गावकरी करीत आहेत.
ग्रीपविना जीवघेणे रोहित्र
सिहोरा परिसरात बोटावर मोजण्याइतपत रोहित्रांना ग्रीप आहेत. शेतकऱ्यांना थ्री फेज वीज पुरवठा करणाऱ्या एकाकी रोहित्रांना ग्रीप नाहीत. सिंगल फेज रोहित्रांची हीच अवस्था आहे. थेट विद्युत तारांची जोडणी करण्यात येत आहे. असे करताना दस्ताने उपलब्ध राहत नाही. यामुळे दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. या उलट तक्रारी असताना साहित्य उपलब्ध नसल्याचे सांगण्यात येत आहे.

Web Title: Power supply to the dam from Rohit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.