वीज चोरीला महावितरणचेच पाठबळ

By Admin | Updated: September 6, 2014 23:51 IST2014-09-06T23:51:32+5:302014-09-06T23:51:32+5:30

गणेशोत्सवाच्या काळात सार्वजनिक गणेश मंडळांकडून केल्या जात असलेल्या रोषणाईसाठी आणि झगमगाटासाठी चक्क चोरीची वीज वापरली जात असल्याचे चार दिवसांपूर्वी ‘लोकमत’ने सचित्र वृत्तांत देऊन

Power stolen only Mahavitaran's support | वीज चोरीला महावितरणचेच पाठबळ

वीज चोरीला महावितरणचेच पाठबळ

एकही कारवाई नाही : ८०० हून अधिक मंडळाकडे अवैध जोडणी
गोंदिया : गणेशोत्सवाच्या काळात सार्वजनिक गणेश मंडळांकडून केल्या जात असलेल्या रोषणाईसाठी आणि झगमगाटासाठी चक्क चोरीची वीज वापरली जात असल्याचे चार दिवसांपूर्वी ‘लोकमत’ने सचित्र वृत्तांत देऊन उघडकीस आणले होते. परंतू त्यानंतरही महावितरणच्या अधिकाऱ्यांना जाग आलेली नाही. गणेशोत्सवाचे आठ दिवस लोटले तरी एकाही मंडळावर महावितरणने कोणतीही कारवाई केलेली नाही. त्यामुळे हा अधिकाऱ्यांचा घाबरटपणा आहे की, वीज चोरीसाठी दिलेली उघड सूट आहे असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
एरवी एखाद्या घरगुती ग्राहकाने अधिकृत मिटरमध्ये थोडी गडबड केली तर त्याला हजारो रुपयांचा दंड ठोठावणारे महावितरणचे अधिकारी कोणतेही मीटर न घेता थेट तारांवर आकडे टाकून वीजप्रवाह घेणाऱ्या मंडळांवर एक रुपयाही दंड ठोठवायला तयार नाही, याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
जिल्ह्यात एकूण ८४७ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आहेत. त्यापैकी गोंदिया शहरातील फक्त १६ आणि इतर २० ते २५ मंडळांनी मिळून जेमतेम ४० च्या जवळपास मंडळांनी गणेशोत्सवाच्या काळासाठी अधिकृतपणे तात्पुरत्या वीज जोडणीसाठी महावितरणकडे अर्ज करून वीज पुरवठा घेतला आहे. या मंडळांना कंपनीकडून मीटरही पुरविण्यात आले आहे. परंतू ८०० पेक्षा जास्त गणेशोत्सव मंडळांनी अनधिकृतपणे थेट किंवा काही छोट्या मंडळांनी घरगुती मीटरवरून वीज पुरवठा घेतल्याचे दिसून येते. गोंदिया शहरात अनेक मोठ्या मंडळांकडून केल्या जाणाऱ्या विद्युत रोषणाईसाठी सर्रास आकडे टाकून वीज पुरवठा घेतला जात आहे. याबाबतची चार दिवसांपूर्वी ‘लोकमत’ने कशा पद्धतीने आकडे टाकून वीज चोरी केली जात आहे याची सचित्र वृत्त प्रकाशित केले होते. त्यानंतरही महावितरणच्या अधिकाऱ्यांना जाग आलेली नाही. किमान नावापुुरत्या तरी काही मंडळांवर कारवाई करून महावितरणचे अधिकारी आपली लाज राखतील अशी अपेक्षा इमाने इतबारे मीटर लावून वीज घेणाऱ्या इतर मंडळांना होती. परंतू महावितरण जर कोणतीच कारवाई करणार नसेल तर आम्हीही पुढील वर्षी अधिकृतपणे वीज जोडणी घेण्याच्या भानगडीत पडण्यापेक्षा अधिच आकडे टाकून वीज घेऊ, अशी भावना काही मंडळांच्या सदस्यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केली. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: Power stolen only Mahavitaran's support

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.