वीजबिल वसुली स्थगित करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:27 IST2021-03-19T04:27:59+5:302021-03-19T04:27:59+5:30
गोंदिया : महाराष्ट्र महावितरण कंपनीकडून थकबाकीदार ग्राहकांकडून वीजबिल वसुलीला सुरूवात करण्यात आली असून, याचा वंचित बहुजन आघाडीने निषेध केला ...

वीजबिल वसुली स्थगित करा
गोंदिया : महाराष्ट्र महावितरण कंपनीकडून थकबाकीदार ग्राहकांकडून वीजबिल वसुलीला सुरूवात करण्यात आली असून, याचा वंचित बहुजन आघाडीने निषेध केला आहे. तसेच वीजबिल वसुली स्थगित करण्यात यावी, अशी मागणी करीत महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांमार्फत ऊर्जामंत्र्यांना गुरूवारी (दि. १८) निवेदन पाठविले.
मागील वर्षी कोरोनाकाळात लॉकडाऊनमुळे कित्येकांच्या हातचे काम गेले. लॉकडाऊन असल्याने महावितरण कंपनीने मीटर रिडिंग घेतले नाही. सुमारे ३ महिन्यांचे बिलही दिले नव्हते. मात्र, त्यानंतर त्या काळातील वीजबिल आकारून ग्राहकांना अवाढव्य बिल पाठविण्यात आले. एवढी रक्कम भरणे ग्राहकांना कठीण झाले. त्यात आता महावितरणकडून थकबाकीदार ग्राहकांकडून वीजबिल वसुली सुरू करण्यात आली आहे. बिल न भरणाऱ्यांची जोडणी कापण्याची कठोर कारवाई केली जात आहे. येत्या काळात परीक्षा असून, अशात वीज जोडणी कापल्यास विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम होणार आहे. याकरिता वीजबिलाची सम प्रमाणात विभागणी करून द्यावी तसेच वीजबिल वसुली स्थगित करावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने केली आहे. यासाठी आघाडीकडून महावितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता यांच्यामार्फत गुरूवारी (दि. १८) ऊर्जामंत्र्याना निवेदन पाठविण्यात आले. याप्रसंगी आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रा. सतीश बंसोड, उपाध्यक्ष विनोद मेश्राम, महासचिव हेमंत बडोले, सचिव प्रकाश डोंगरे, राजू राहुलकर, सिध्दार्थ हुमणे, कोषाध्यक्ष एस. डी. महाजन, प्रसिद्धीप्रमुख एन. ए. मेश्राम, शहर अध्यक्ष विनोद मेश्राम यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.