पोस्टकार्ड स्पर्धेत कौशिकी, हर्षिता व श्रेया प्रथम
By Admin | Updated: August 30, 2015 01:38 IST2015-08-30T01:38:20+5:302015-08-30T01:38:20+5:30
लोकमत बाल विकास मंच, मृणाल कोचिंग क्लासेस व केटीएस जिल्हा सामान्य रूग्णालयाच्या नेत्र विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ...

पोस्टकार्ड स्पर्धेत कौशिकी, हर्षिता व श्रेया प्रथम
बक्षीस वितरण सोहळा थाटात : बालविकास मंचच्या ‘शोध’ पुस्तकाचे अनावरण
गोंदिया : लोकमत बाल विकास मंच, मृणाल कोचिंग क्लासेस व केटीएस जिल्हा सामान्य रूग्णालयाच्या नेत्र विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नेत्रदानावर जनजागृती करण्यासाठी पोस्टकार्ड संदेश स्पर्धा घेण्यात आली. तीन गटात घेण्यात आलेल्या स्पर्धेत कौशिकी, हर्षिता व श्रेया प्रथम क्रमांकाच्या मानकरी ठरल्या.
नुकतेच शहराच्या पॅसिफीक हॉटेलमध्ये आयोजित बक्षीस वितरण कार्यक्रमात जिल्ह्यातील शाळांचा सहभाग होता. पोस्टकार्डवर नेत्रदानावर संदेश लिहून एका नातेवाईकाला पाठवायचा होता. या स्पर्धेसाठी तीन गट होते. पहिला वर्ग ३ ते ५, दुसऱ्या गटात वर्ग ६ ते ९ व तिसऱ्या गटात १० वी ते त्यावरील विद्यार्थ्यांसाठी ही स्पर्धा होती.
या स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रवी धकाते, उद्घाटक गोंदिया पब्लिक स्कूलच्या सचिव डॉ. इंदिरा सपाटे, अतिथी म्हणून विमल असाटी, भूवन बिसेन, नर्मदा आर्ट गॅलरीचे तोलाराम मानकानी, लोकमत कार्यालय प्रमुख मिलिंद वाढई, जिल्हा प्रतिनिधी मनोज ताजने, श्रीकांत पिल्लेवार उपस्थित होते. स्वागत गीत व पुष्पगुच्छाने पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. रवी धकाते यांनी लोकमतने सुरू केलेला हा अभिनव उपक्रम आहे. या उपक्रमातून शंभर टक्के जनजागृती नेत्रदानाची झाली. विद्यार्थ्यांनी समाजाचे मन नेत्रदानाकडे आकर्षीत केले. डॉ. इंदिरा सपाटे म्हणाल्या, सामाजिक बांधिलकी साध्य करण्यास हा व्यासपीठ उत्तम आहे. विद्यार्थ्यांच्या माध्यामातून पालक व नातेवाईकांपर्यंत संदेश पोहचविण्याची ही सुंदर कल्पना असल्याचे त्या म्हणाल्या. विमल असाटी यांनी या कार्यक्रमाची प्रसंशा करून समाजमनावर ठसा उमटविणारा हा उपक्रम असल्याचे म्हणाले. यावेळी ज्ञानगंगा स्पर्धेतील विजेत्यांनाही बक्षीस वितरण करण्यात आले. दुर्वांश शरणागत याला क्रिकेट किट, कृणाल संजय शनवारे याला सायकल वितरण करण्यात आले.
या स्पर्धेत गोंदिया पब्लिक स्कूल, चंचलबेन मणीभाई पटेल हायस्कूल, जानकीदेवी चौरागडे हायस्कूल, शारदा कॉन्व्हेंट, संस्कार कॉन्व्हेंट व बी.बी. पब्लिक स्कूल या शाळांचा मोठ्या संख्येत सहभाग होता. संचालन नूतन खोब्रागडे व आभार बालविकास मंचचे जिल्हा संयोजक श्रीकांत पिल्लेवार यांनी मानले. यशस्वीतेसाठी वर्षा भांडारकर, अविनाश गोंधुळे, वरूण खंगार, अनुपम बन्सोड, मनीष मेश्राम, मीना दीक्षित, असलम खान, ऋषभ गडपायले व संतोष बिलोने यांनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)