डाक विभागाने उत्तरतालिकांसह उमेदवारांचे गुण प्रसिद्ध करावे

By Admin | Updated: September 16, 2015 02:29 IST2015-09-16T02:29:28+5:302015-09-16T02:29:28+5:30

महाराष्ट्र पोस्टल सर्कल मुंबईच्या वतीने जाहिरात प्रसिद्ध करून पोस्टमन-मेलगार्ड व एमटीएस (मल्टी टास्कींग स्टॉफ) पदांसाठी स्पर्धा परीक्षा घेण्यात आली.

The postal department should publish the marks of the candidates along with the replyants | डाक विभागाने उत्तरतालिकांसह उमेदवारांचे गुण प्रसिद्ध करावे

डाक विभागाने उत्तरतालिकांसह उमेदवारांचे गुण प्रसिद्ध करावे

उमेदवारांची मागणी : उत्तरपत्रिकांची कार्बनकॉपी न मिळाल्याने संभ्रमाची स्थिती
गोंदिया : महाराष्ट्र पोस्टल सर्कल मुंबईच्या वतीने जाहिरात प्रसिद्ध करून पोस्टमन-मेलगार्ड व एमटीएस (मल्टी टास्कींग स्टॉफ) पदांसाठी स्पर्धा परीक्षा घेण्यात आली. सध्या या पदांच्या उत्तरतालिका प्रसिद्ध करण्यात आल्या. मात्र पोस्टमन पदांसाठी परीक्षा दिलेल्या उमेदवारांना उत्तरपत्रिकांची कार्बनकॉपी देण्यात न आल्याने त्यांना आपल्याला किती गुण मिळाले, हे समजू शकत नाही. त्यामुळे प्रश्नसंचनिहाय उत्तरतालिका व उमेदवारांना मिळालेले गुण प्रसिद्ध करण्याची मागणी उमेदवारांनी केली आहे.
प्राप्त माहितीनुसार, महाराष्ट्र पोस्टल सर्कल मुंबई विभागामार्फत रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. नागपूर पोस्टल विभागासाठी नागपूर येथील विविध शाळांत परीक्षा केंद्रे देऊन परीक्षा घेण्यात आली. परंतु परीक्षा कक्षातील काही पर्यवेक्षकांच्या अपुऱ्या माहितीमुळे काही उमेदवारांना उत्तरपत्रिकांची कार्बनकॉपी देण्यात आली नाही. यात २९ मार्च २०१५ रोजी पोस्टमन व ३ मे २०१५ रोजी एमटीएस पदांसाठी परीक्षा घेण्यात आल्या. परीक्षेतील रोलनंबर, पद व भाषा आदी माहिती संबंधित वेबसाईवर घालताच परीक्षेतील प्रश्नांची योग्य उत्तरे कोणती, याची माहिती मिळते. तसेच उत्तराबाबत आक्षेप नोंदवायचे असल्यास ते नोंदविण्याची संधीसुद्धा नेटवर उपलब्ध करून देण्यात आली आहे.
मात्र पोस्टमन पदासाठी ज्या उमेदवारांनी परीक्षा दिली, त्यांना त्यांच्या काही परीक्षा केंद्रांवरून उत्तरपत्रिकेची कार्बन कॉपी देण्यात आली नाही. या प्रकारामुळे आपण नेमके कोणती उत्तरे नमूद केली, हेच कळणे काही उमेदवारांना अशक्य आहे.
त्यामुळे प्रश्नपत्रिकांच्या संचानिहाय उत्तरतालिका व उमेदवारांना मिळालेले गुण इंटरनेटवर संबंधित वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात यावे, अशी मागणी उमेदवारांनी केली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: The postal department should publish the marks of the candidates along with the replyants

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.